JNU मध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या मुलीची ओळख पटली

जवाहरलाल नेहरु विद्यापीठात विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्यांमध्ये सहभागी असणाऱ्या मुलीची ओळख पटली आहे (Suspect mask girl in JNU attack identified).

JNU मध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या मुलीची ओळख पटली
Follow us
| Updated on: Jan 13, 2020 | 10:32 PM

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरु विद्यापीठात विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्यांमध्ये सहभागी असणाऱ्या मुलीची ओळख पटली आहे (Suspect mask girl in JNU attack identified). हल्ल्यानंतर तोंड झाकलेलं आणि हातात काठी घेतलेल्या एका मुलीचा फोटो व्हायरल झाला होता. तसेच दिल्ली पोलिसांच्या तपासावर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. अखेर या मुलीची ओळख पटली आहे. कोमल शर्मा असं या आरोपी मुलीचं नाव आहे. ही मुलगी दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी आहे (Suspect mask girl in JNU attack identified). ती अखिल भारतीय विद्यार्थी संघटना (ABVP) या भाजप संलग्न संघटनेशी संबंधित असल्याचं एका वृत्तवाहिनीच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड झालं आहे.

5 जानेवारीला JNU मधील पेरियार हॉस्टेलमध्ये तोडफोड आणि विद्यार्थ्यांवर हल्ला झाला. या प्रसंगाचा हल्लेखारांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. यात एक चेक शर्ट घातलेली तरुणी तोंडाला रुमाल बांधून हल्ला करताना दिसत होती. चौकशीत ही तरुणी दिल्ली विद्यापीठाच्या दौलत राम कॉलेजमध्ये शिकत असल्याचं उघड झालं. पोलिसांनी तिला नोटीस पाठवून चौकशीला बोलावलं आहे.

दिल्ली पोलिसांनी आरोपी मुलीसह 3 जणांना चौकशीसाठी समन्स पाठवलं आहे. लवकरच या लोकांची चौकशी होणार आहे. पोलिसांनी व्हायरल व्हिडीओवरुन 9 जणांची ओळख निश्चित केली होती. त्यापैकीच हे तिघं आहेत. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या नेतृत्त्वात एक विशेष तपास पथक याची चौकशी करणार आहे.

पोलिसांनी समन्स दिलेल्या विद्यार्थ्यांना वेगवगळ्या दिवशी वेगवेगळा वेळ दिला आहे. दिल्ली पोलीस JNU मधील विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आईशी घोष हिची देखील चौकशी करणार असल्याचं बोललं जात आहे.

संबंधित बातम्या :

JNU मध्ये विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला, 40 हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षक गंभीर जखमी

JNU राडा : योगेंद्र यादवांनाही मारहाण, राडेबाजीचं व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल

JNU हल्ल्यानंतर दीपिका पदुकोणही जखमी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ

देशाचे तुकडे करु इच्छिणाऱ्यांसोबत दीपिका उभी : स्मृती इराणी

JNU राडा : 9 संशयितांची रेखाचित्रे जारी, विद्यार्थी संघटनेच्या आइशी घोषचंही नाव

Non Stop LIVE Update
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.