AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यातील सरकार महाविकास आघाडीचे नसून महाभकास, भाजपचे नेते आनंदराव राऊत यांचा आरोप

आनंदराव राऊत म्हणाले, सरकारमधील नेते सत्ता येण्यापूर्वीच हेक्टरी 25 हजार देण्याची मागणी करत होते. पण आता महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं नुकसान झालं असताना केवळ 10 हजार कोटींची मदत जाहीर केली.

राज्यातील सरकार महाविकास आघाडीचे नसून महाभकास, भाजपचे नेते आनंदराव राऊत यांचा आरोप
aanandrao raut
| Edited By: | Updated on: Nov 21, 2021 | 5:14 PM
Share

नागपूर : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार नसून महाभकास सरकार आहे, असा आरोप भाजप किसान मोर्चाचे प्रदेश महामंत्री आनंदराव राऊत यांनी केलाय. नागपुरात पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते.

आनंदराव राऊत म्हणाले, सरकारमधील नेते सत्ता येण्यापूर्वीच हेक्टरी 25 हजार देण्याची मागणी करत होते. पण आता महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं नुकसान झालं असताना केवळ 10 हजार कोटींची मदत जाहीर केली. राज्यात देवेंद्र फडणवीस यांचं सरकार असताना एनडीआरएफच्या निकषांच्या तीनपट आर्थिक मदत दोन हेक्टरपर्यंत शेतकऱ्याना देण्यात आली.

या महाविकास आघाडी सरकारनं 7 ते 8 लाख शेतकऱ्याचं वीज कनेक्शन कापन्यांचे महापाप केले आहे. यानंतर सरसकट वीज कापणार असल्यानं शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना आर्थिक मदत कारण्याचं सोडून वीज कापून कमरेवर लात मारण्याचे महापाप हे सरकार करत आहे, असा आरोपही आनंदराव वंजारी यांनी केलाय.

शेतकऱ्याचं कापलेले कनेक्शन जोडले पाहिजे. भविष्यतही वीज कनेक्शन कापणार नाही असे आश्वासन सरकारनं द्यावं, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये आर्थिक मदत देण्याचा शब्द पाळला पाहिजे अशी मागणी करण्यात आली अन्यथा येणाऱ्या अधिवेशनात विधानभवनावर मोर्चा काढू असा इशारा दिला आहे.

आघाडीच्या फसवणुकीची 2 वर्षे पूर्ण

अकोला : आतापर्यंत महाविकास आघाडीच्या फसवणुकीची 2 वर्षे पूर्ण केली आहे, असा घणाघाती आरोप भारतीय जनता पार्टीचे अकोला जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे. अतिवृष्टीग्रस्तांना तसेच वादळग्रस्तांना मदत देऊन शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफीबाबतही बळीराजाची फसवणूक केली आहे. पीक विमा कंपन्यांना फायदेशीर अटी बनवून नुकसानभरपाई मिळण्यापासून वंचित ठेवले आहे. नैसर्गिक संकटामुळे खचलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याऐवजी महाविकास आघाडी सरकारनं राज्यातील शेतकऱ्यांना आपल्या भ्रष्ट, नाकर्त्या आणि कोडग्या कारभारामुळे उद्ध्वस्त केले आहे, असंही रणधीर सावरकर म्हणाले.

जरंडेश्वरप्रमाणेच खोतकरांचा घोटाळा, सोमय्यांचा आरोप; नांगरे-पाटलांची पत्नी, सासऱ्यांचेही घेतले नाव, चौकशीच्या मागणीसाठी उद्या दिल्लीला जाणार

12 तारखेची हिंसा डिलीट करून 13 तारखेच्या घटनेवर जोर का दिला जात आहे?, यशोमती ठाकूर गप्प का?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.