हिरोच्या इलेक्ट्रॉनिक स्कूटरवर 3 हजार रुपयांची सूट
यंदाच्या उत्सवात इलेक्ट्रॉनिक स्कूटर खरेदीवर ग्राहकांना मोठी सूट (Hero electronic scooter discount) मिळणार आहे.

मुंबई : यंदाच्या उत्सवात इलेक्ट्रॉनिक स्कूटर खरेदीवर ग्राहकांना मोठी सूट (Hero electronic scooter discount) मिळणार आहे. देशातील प्रमुख इलेक्टिक स्कूटर कंपनी हिरो आपल्या सर्व इलेक्ट्रिक स्कूटरवर 3 हजार रुपयांची सूट (Hero electronic scooter discount) देणार आहे. ही सूट देशातील सर्व डीलरकडे उपलब्ध आहे.
हिरो इलेक्ट्रिक स्कूटरच्या पोर्टफोलिओमध्ये Dash, Flash, Nyx, Optima आणि Photon चा समावेश आहे. या स्कूटरची सुरुवात 38 हजार रुपये असून ती 87 हजार रुपयांपर्यंत आहे. या सर्व स्कूटरच्या खरेदीवर तुम्ही 3 हजार रुपयांची बचत करु शकता. नुकतेच कंपनीने बाजारात आपली नवीन इलेक्ट्रॉनिक स्कूटर Dash लाँच केली आहे. या स्कूटरवरही कंपनीने सूट दिली आहे.
या नवीन Dash ची किंमत 62 हजार रुपयेपर्यंत आहे. यामध्ये कंपनीने 28Ah क्षमतेची Lithium-ion बॅटरी दिली आहे. सिंगल चार्जमध्ये कंपनी 60 किलोमीटरपर्यंत धावू शकते, असा दावा कंपनीने केला आहे. याशिवाय यामध्ये फास्ट चार्जिंगचीही सुविधा देण्यात आली आहे. ही स्कूटर 4 तासात फुल चार्ज होते.
या स्कूटरमध्ये कंपनीने LED डे टाईम रनिंग लाईट्सही दिली आहे. याशिवाय डिजीटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर, यूएसबी चार्जिंग पोर्ट, ट्यूबलेस टायरसारखे फीचर स्कूटरमध्ये दिलेले आहेत.