AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Lockdown: 120 दिवस खूप सहन केलं, आता क्षमता संपली, लॉकडाऊनवाढीला व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध

व्यापाऱ्यांनी 23 जुलैनंतर पुण्याच नव्यानं लॉकडाऊन जाहीर करण्यास तीव्र विरोध केला आहे (Traders Union oppose extension in Pune Lockdown).

Pune Lockdown: 120 दिवस खूप सहन केलं, आता क्षमता संपली, लॉकडाऊनवाढीला व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध
| Updated on: Jul 20, 2020 | 6:41 PM
Share

पुणे : व्यापाऱ्यांनी 23 जुलैनंतर पुण्याच नव्यानं लॉकडाऊन जाहीर करण्यास तीव्र विरोध केला आहे (Traders Union oppose extension in Pune Lockdown). तसेच लॉकडाऊनमध्ये वाढ केल्यास आंदोलनाचाही इशारा दिलाय. दुकाने बंद ठेवणे हे कोरोनावरील औषध नाही. कोरोना दुकानातून पसरत नाही. 120 दिवसांपासून दुकाने बंद असल्याने उत्पन्न शून्य आहे. व्यापाऱ्यांनी 120 दिवस खूप सहन केलं. मात्र आता सहन करण्याची क्षमता संपल्याचं मत व्यापारी महासंघाने व्यक्त केलं आहे. या संदर्भात महासंघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांना पत्रही पाठवलं आहे.

व्यापारी महासंघाने म्हटलं, “23 जुलैनंतर कोणताही लॉकडाऊन जाहीर करु नये. या लॉकडाऊन मुदतवाढीला आमचा 30 हजार व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध राहील. त्याचप्रमाणे सम-विषम धर्तीवर दुकाने चालू ठेवण्यासही आमचा तीव्र विरोध आहे. व्यापाऱ्यांनी 120 दिवस खूप सहन केलं आहे. आता सहन करण्याची क्षमता संपली आहे.”

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“आता व्यापारी आत्महत्या किंवा आत्मदहन करण्यासाठी परवानगी मागत आहे. लॉकडाऊन वाढवल्यास आंदोलन, उपोषणाचा मार्ग स्वीकारु.” उद्रेक होऊन महासंघाच्या सदस्यांनी आत्महत्या, आत्मदहन केल्यास आणि कोणाचा मृत्यू झाल्यास यास सरकार जबाबदार राहील,” असा इशाराही व्यापारी महासंघाने यावेळी दिला.

“120 दिवसांपासून दुकाने बंद असून उत्पन्न शून्य आहे. दुकाने बंद असताना 1 लाख नोकरांचा पगार द्यावा लागत आहे. सम-विषम कालावधीत महिन्यात केवळ 15 दिवस दुकाने सुरु राहतात. मात्र कामगारांना महिन्याचा पगार द्यावा लागतो. दुकाने बंद असताना वीजेचे बिल, बँकेची कर्ज थकली आहेत. घर आणि दुकान भाडेही चालू आहे,” असंही पुणे व्यापारी महासंघाने म्हटलंय. यासंदर्भात पुणे व्यापारी महासंघाने प्रशासनाकडे वेळे संदर्भातील मागण्या केल्यात. दुकाने 7 दिवस सकाळी 10 ते सायंकाळी 7 या वेळेत सुरु राहावेत. किंवा सोमवार ते शुक्रवार 5 दिवस सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत परवानगी द्यावी. शनिवार आणि रविवारी पूर्ण लॉकडाऊन जाहीर करावा, अशा मागण्या व्यापारी महासंघाने केल्या आहेत.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

“मास्क न वापरणारे, सॅनिटायझर आणि शारीरिक अंतर न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. दुकानं किमान 3 दिवसांसाठी सील करावेत. बेजबाबदार नागरिक, वाहनचालक आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात दंड आकारावा. त्यांची वाहनं 8 दिवसांसाठी जप्त करावी, अशाही सूचना पुणे व्यापारी महासंघाने केल्या आहेत. पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका यांनी याविषयी माहिती दिली.

हेही वाचा :

पुण्यात व्हेंटिलेटर नसल्याचा आरोप गिरीश बापटांनी फेटाळला, लॉकडाऊन एकमेव उपाय नसल्याचाही दावा

Pune ICU Ventilator Bed | पुण्यात आयसीयू व्हेंटिलेटरचा एकही बेड शिल्लक नाही!

Sangli Lockdown | सांगली जिल्ह्यात आठ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर

Traders Union oppose extension in Pune Lockdown

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.