कोल्हापुरात उड्डाण पुलाखाली स्फोट, ट्रक चालकाचा मृत्यू

कोल्हापुरातील उजळाईवाडी उड्डाणपुलाखाली बेवारस वस्तूच्या स्फोटात (Kolhapur Blast) ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे. मतदानाला अवघे दोन दिवस उरले असताना झालेल्या या स्फोटामुळे (Kolhapur Blast) खळबळ उडाली आहे.

कोल्हापुरात उड्डाण पुलाखाली स्फोट, ट्रक चालकाचा मृत्यू

कोल्हापूर : कोल्हापुरातील उजळाईवाडी उड्डाणपुलाखाली बेवारस वस्तूच्या स्फोटात (Kolhapur Blast) ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे. मतदानाला अवघे दोन दिवस उरले असताना झालेल्या या स्फोटामुळे (Kolhapur Blast) खळबळ उडाली आहे. शुक्रवारी मध्यरात्री हा स्पोट झाला.

दत्तात्रय पाटील असं मृत्यू झालेल्या ट्रकचालकाचं नाव आहे.  पुणे- बेंगलोर महामार्गावर उजळाईवाडी उड्डाणपुलाखाली पाटील यांच्या ट्रकचा एक्सेल फुटल्याने ते पुलाखाली उभे होते. पुलाखाली असलेल्या एका बेवारस वस्तूला त्यांनी लाथ मारली. त्यानंतर हा स्फोट झाला आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अल्युमिनिअमचा डबा सदृश्य वस्तूवर लाथ मारल्यानंतर हा स्फोट झाला. या स्फोटाच्या आवाजाने ट्रकच्या काचांना तडे गेले. याशिवाय परिसरातील घरांच्या काचाही फुटल्याचे सांगण्यात येत आहे. बॉम्बशोध पथक,श्वान पथकाच्या मदतीने पोलिसांनी या घटनेचा शोध सुरु केला आहे.

या स्फोटाचा आवाज इतका भीषण होता की आजूबाजूच्या घरांमध्येही त्याची दाहकता पोहोचली. आवाज नेमका कसला आहे, याची कल्पनाच अनेकांना आली नाही.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI