वीज वितरण कंपनीच्या कंत्राटदाराला तुकाराम मुंढेंचा दणका, रस्ता खोदल्याने 1 लाख 92 हजारांचा दंड

वीज वितरण कंपनीच्या कंत्राटदाराला तुकाराम मुंढेंचा दणका, रस्ता खोदल्याने 1 लाख 92 हजारांचा दंड

तुकाराम मुंढे यांनी वीज वितरण कंपनीच्या कंत्राटदाराला चांगलाच दणका दिला आहे (Tukaram Mundhe on road digging MSEB contractor).

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Aug 14, 2020 | 11:11 AM

नागपूर : बेकायदेशीर काम करणाऱ्यांविरोधात नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा कारवाईचा धडाका सुरुच आहे. यावेळी तुकाराम मुंढे यांनी वीज वितरण कंपनीच्या कंत्राटदाराला चांगलाच दणका दिला आहे (Tukaram Mundhe on road digging MSEB contractor). महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता परस्पर रस्ता खोदणाऱ्या कंत्राटदाराला मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंनी थेट 1 लाख 92 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

तुकाराम मुंढेंच्या या कारवाईनंतर कंत्राटदारांच्या मनात चांगलीच धडकी भरली आहे. अनेकदा कंत्राटदार दुरुस्तीच्या कामांसाठी कोणतीही परवानगी न घेता रस्ते खोदतात आणि त्याची दुरुस्ती न करता तसेच खड्डे राहतात. त्यामुळे अनेक चांगले रस्ते खराब होतात. त्याचा अंतिमतः फटका प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांनाच बसतो. मात्र, तुकाराम मुंढे यांनी हाच मुद्दा लक्षात घेऊन कंत्राटदारांना चांगलाच धडा शिकवला आहे.

हेही वाचा : नागपुरात दुकानदारांसाठी कोरोना चाचणी बंधनकारक, तुकाराम मुंढेंचे आदेश

विनापरवानगी रस्ता खोदल्याप्रकरणी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कंत्राटदाराला 1 लाख 92 हजार रुपयांचा दंड तर ठोठावलाच आहे. सोबत हे काम झालेल्या झोनच्या तीन अभियंत्र्यांना देखील कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. त्यामुळे बेकायदेशीर काम करणाऱ्या कंत्राटदारांना पाठीशी घालणाऱ्यांनाही योग्य संदेश गेला आहे.

तुकाराम मुंढेंचा कोरोना नियंत्रणासाठी विशेष प्लॅन

दरम्यान, तुकाराम मुंढे यांनी कोरोना नियंत्रणासाठी एक विशेष प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी नागपूरातील प्रत्येक वॉर्डात कोरोना चाचणी सुरु करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. नागपुरात लवकरच 10 ते 11 ठिकाणी कोव्हिड चाचणी केंद्र सुरु होणार आहे. कोरोना नियंत्रणासाठी महानगरपालिकेने मेगा प्लॅन तयार केला आहे.

हेही वाचा : 3600 सीसीटीव्हींची नागपूरवर नजर, तुकाराम मुंढेंकडून इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरचा आढावा

नागपुरात सध्या 21 ठिकाणी कोरोना चाचणी होत आहेत. सध्या रोज 3 हजारपेक्षा जास्त कोरोना चाचण्या होतात. या नव्या कोरोना चाचणी केंद्राच्या उभारणीसह नागपूरमधील कोरोना चाचण्यांचा आकडा रोज 5 हजारांवर जाणार आहे. यामुळे कोरोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींना लवकर शोधून त्यांच्यावर उपचार करणं शक्य होणार आहे. त्यामुळे संसर्गाचा धोकाही कमी होणार आहे.

संबंधित बातम्या :

‘आधी नोटीस, मग अ‍ॅक्शन’, तुकाराम मुंढेंचे व्होकार्डला 2 दिवसात अतिरिक्त शुल्क परत करण्याचे आदेश

दुकानदारांसाठी कोरोना चाचणी बंधनकारक, हा तुघलकी निर्णय, तुकाराम मुंढेंच्या निर्णयाला महापौरांचा विरोध

नागपूरमधील खासगी रुग्णालयांवर पालिकेचा वॉच, तुकाराम मुंढेंकडून विशेष पथकाचं गठन

Tukaram Mundhe on road digging MSEB contractor

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें