खेळता खेळता दोन वर्षाचा मुलगा 35 फूट बोअरवेलमध्ये पडला

खेळता खेळता दोन वर्षाचा मुलगा 35 फूट बोअरवेलमध्ये पडला

तामिळनाडू येथे दोन वर्षाचा मुलगा खेळताना एका बोरवेअलमध्ये (two years boy fell in borwell) पडला. ही घटना तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील मनाप्पाराई येथे घडली.

सचिन पाटील

| Edited By:

Oct 26, 2019 | 8:01 AM

चेन्नई : तामिळनाडू येथे दोन वर्षाचा मुलगा खेळता खेळता एका बोअरवेअलमध्ये (two years boy fell in borwell) पडला. ही घटना तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील मनाप्पाराई येथे घडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच बचाव पथक तेथे दाखल झाले आहे. मुलाला बाहरे काढण्यासाठी सध्या बचाव कार्य सुरु आहे. बोअरवेल 35 फूट (two years boy fell in borwell) खोल असल्याचे म्हटलं जात आहे. ज्याला 25 फूटपर्यंत झाकलं आहे. पण मुसळधार पावसामुळे पुन्हा हा खड्डा मोठा झाला. मुलगा अंदाजे 25 फूट खोलीपर्यंत अडकला आहे, असं स्थानिकांनी सांगितले.

“मुलगा जवळपास 25 फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला आहे. या बोअरवेलमध्ये कॅमेरा आणि ऑक्सिजन पाठवले आहे”, असं बचाव पथकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मुलाला वाचवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत.

स्थानिक पोलिसांनी मदुरईवरुन विशेष बचाव पथक बोलवण्यात आलं आहे. जे मुलाला सुखरुप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. बोअरवेलच्या समान बाजूला दुसरा खड्डा खोदण्यात आला आहे. तसेच येथे मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांनी गर्दी केली आहे.

डोंगराळ भाग असल्यामुळे बचाव पथकाला थोड्या अडचणी येत आहेत. अर्थमुवरच्या मदतीने बाजूला दुसरा खड्डा खोदण्यात येत आहे. खड्डा खोदताना 10 फुटांवर दगड असल्याने त्यांना खड्डा खोदण्यासाठी अडचण होत आहे. यासाठी ड्रील मशीनच्या मदतीने खड्डा खोदण्यात येत आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें