साताऱ्याच्या राजघराण्यातील शाही सीमोल्लंघन सोहळा रद्द, उदयनराजेंचा मोठा निर्णय

छत्रपती राजघराण्यातील शाही सिमोल्लंघन सोहळा रद्द करण्यात आला आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका विचारात घेऊन छत्रपती उदयनराजे भोसले यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

साताऱ्याच्या राजघराण्यातील शाही सीमोल्लंघन सोहळा रद्द, उदयनराजेंचा मोठा निर्णय

सातारा : छत्रपती राजघराण्यातील शाही सिमोल्लंघन सोहळा रद्द करण्यात आला आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका विचारात घेऊन छत्रपती उदयनराजे भोसले यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी जलमंदिर येथून भवानी तलवारीच्या पुजनानंतर पोवई नाक्यापर्यंत ही भव्य शाही मिरवणूक जाते. मात्र, यंदा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उदयनराजेंनी ही मिरवणूक रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतलाय (Udayanraje Bhosale cancel Shahi Simollanghan Program of Satara).

छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस याठिकाणी वर्षानुवर्षे परंपरागत शाही सीमोल्लंघन सोहळा साजरा करण्यात येतो. मात्र, यावर्षी हा सोहळा रद्द करण्याचा निर्णय राजघराण्याच्यावतीने घेण्यात आला आहे. कोरोनाचा धोका विचारात घेऊन हा निर्णय छत्रपती उदयनराजे भोसले यांनी घेतला आहे.

दरवर्षी या मिरवणुकीत शाही सोहळ्याला सातारकरांची मोठी गर्दी होत असते. मात्र यावर्षी भवानी मातेच्या तलवारीचे विधिवत पूजन केले जाणार आहे. जलमंदिर पॅलेस ते पोवई नाकापर्यंत चालणारी भव्य शाही मिरवणूक मात्र रद्द करण्यात आली आहे. छत्रपतींच्या काळापासून ही मिरवणुकीची ही परंपरा आहे. इतक्या वर्षांनी प्रथमच ही परंपरा खंडित होत आहे.

दरम्यान, कोल्हापूरातील उद्याचा (25 ऑक्टोबर) शाही दसरा सोहळा देखील रद्द करण्यात आलाय. यंदा कोरोनामुळे दसरा चौकात छत्रपती घराण्याचा सीमोल्लंघन सोहळा होणार नाही. श्रीमंत शाहू छत्रपती आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त बैठकीत या आधीच हा निर्णय घेण्यात आलाय. छत्रपती घराण्याकडून साधेपणाने हे सीमोल्लंघन होणार आहे.

हेही वाचा :

आम्ही फक्त तीनच राजेंना मानतो, पहिले सम्राट अशोक : प्रकाश आंबेडकर

उदयनराजेंवर प्रकाश आंबेडकरांची टीका, संभाजी भिडेंची प्रतिक्रिया काय?

सेनाभवनावर शिवरायांचा फोटो खाली, बाळासाहेबांचा वर का? शिवसेना नाव काढून ‘ठाकरे सेना’ करा : उदयनराजे

Udayanraje Bhosale cancel Shahi Simollanghan Program of Satara

Published On - 6:01 pm, Sat, 24 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI