LIVE : पहिल्यांदाच ठाकरे घराण्यावर खोटारडेपणाचा आरोप, पण देवेंद्र फडणवीसच खोटारडे : उद्धव ठाकरे

देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर, पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray press conference) यांनीही पत्रकार परिषद बोलावली.

LIVE : पहिल्यांदाच ठाकरे घराण्यावर खोटारडेपणाचा आरोप, पण देवेंद्र फडणवीसच खोटारडे : उद्धव ठाकरे


मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर, पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray press conference) यांनीही पत्रकार परिषद बोलावली. फडणवीसांनी राज्यपालांकडे राजीनामा दिल्यानंतर 4.30 वा पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही (Uddhav Thackeray press conference)  माध्यमांशी बोलण्यासाठी संध्याकाळी 6 वाजताचं निमंत्रण दिलं. त्यामुळे उद्धव ठाकरे काय उत्तर देणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात होती.

विधानसभा निकालादिवशीच आपण पत्रकार परिषदेसाठी इथे भेटलो होतो. आज थोड्यावेळापूर्वी मी महाराष्ट्राच्या काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद पाहिली आणि काळजी वाटली. त्यांनी मागील 5 वर्षात जे अचाट कामं केली ते सांगितली. मी त्यांना धन्यवाद देतो. आम्ही त्यांच्यासोबत 5 वर्ष राहिलो नसतो तर त्यांना करता आली नसती. म्हणजेच आम्ही विकासाच्या आड आलो नाही. आम्ही शब्द पाळतो. बाळासाहेबांकडून मी तेच शिकलो आहे.

पहिल्या प्रथम कोणीतरी ठाकरे घराण्यावर खोटारडेपणाचा आरोप केला आहे.  देवेंद्र फडणवीसांनी अमित शाहांचा दाखला देऊन माझ्यावर खोटेपणाचा आरोप केला, पण जनतेला सर्व माहिताय कोण खोटं बोलतंय

आमचं काय ठरलं होतं याला सर्व साक्षी आहेत. लोकसभेच्यावेळी युतीसाठी मी दिल्लीत गेलो नव्हतो ते मुंबईत आले होते. चर्चेत आम्हाला उपमुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव दिला होता. मात्र, त्यासाठी मी लाचार नाही. मी बाळासाहेब ठाकरे यांना शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याचं वचन दिलं होतं. ते मी पूर्ण करणार. त्याच्यासाठी भाजप, अमित शाह किंवा देवेंद्र फडणवीस यांची गरज नाही.

शिवसेना प्रमुखांच्या खोलीत बसून चर्चा झाली. अमित शाहांनी  देवेंद्र फडणवीसांना माहिती दिली. फडणवीस यांनी आत्ता जाहीर करु नका. वेळ आली की मी माझ्या पक्षाला सांगेल असं म्हटले. तसेच आत्ता सांगितलं तर पक्षात माझी (अमित शाह) अडचण होईल असं नमूद केलं. ते शब्दखेळ करण्यात हुशार आहेत. त्याचा अनुभव मी आत्ता घेतला.

हे आम्हाला गोड बोलून संपवण्याचा प्रयत्न करत होते. देवेंद्र फडणवीस माझे चांगले मित्र होते. त्यांच्याकडून मला हे अपेक्षित नव्हते. इतर कोणी मुख्यमंत्री असतं तर पाठिंबा दिला असता की नाही माहित नाही.

मी खोटारडा म्हणून शिवसैनिकांसमोर जाऊ शकत नाही. जमत नाही असं म्हटलं तर एकवेळ ठिक आहे. पण ठरलंच नाही हे सहन करणार नाही. खोटं बोलण्याचा हिशोब काढला तर अच्छे दिन, नोटबंदीपासून कोण खोटं बोललं हे दिसेल.

मी 124 जागा स्वीकारल्या. जिंकणाऱ्या जागा ठेऊन हरणाऱ्या दिल्या. माझ्याशी न बोलता साताऱ्याची जागा घेतली. उदयनराजे मोदींना काय म्हणाले होते, त्यांनी कोणते पेढे वाटले?

मी नरेंद्र मोदींवर कधीच टीका केलेली नाही, त्यांनी मला धाकटा भाऊ मानलं आहे, भावा-भावाचं नातं पाहून कोणाच्या पोटात दुखत असेल, तर त्याचा मोदींनी शोध घ्यावा : उद्धव ठाकरे

2014 ला भाजपच्या नेत्यांनी दुष्यंत मुख्यमंत्री होतील असं म्हटलं आणि नंतर शब्द बदलला. भाजनं आम्हाला सरळ सांगावं की आमचं ठरलं होतं आणि ते शक्य होणार नाही.

लोकसभेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती केली त्याचा आनंद होता. मात्र, जे झालं गेलं ते गंगेला मिळालं, गंगा साफ केली नसली तरी. गंगा साफ करताना यांची मनं कलुषित झाली. यांच्या मनात सत्तेची लालसा इतक्या स्तरावर जाईन याची कल्पना नव्हती.

बहुमत नसताना काळजीवाहू मुख्यमंत्री आमचंच सरकार येणार म्हणत आहेत. हे कसं येणार आहे मग. जर तुम्ही असं म्हणत आहेत तर आम्ही पर्याय ठेवले तर काय चुकीचं. तुम्ही जे चाळे केले त्यातूनच आम्हीही शिकलो आहे.

माझ्याकडे वेळ असूनही मी त्यांच्याशी चर्चा केली नाही. जे मला खोटं ठरवणार आहेत त्यांच्याशी कसं बोलणार. त्यांनी आमच्यावर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी तीन तीन वेळा बोलण्याचा आरोप केला. हे आमच्यावर काय पाळत ठेवत होते का?

महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही एकटं सोडू शकत नाही. संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ आहे. शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. अशा स्थितीत कर्जमाफी, पीकविमा, दुष्काळी निधी पोहचला नाही, पंतप्रधानांच्या योजनेचे सहा हजार पोहचले नाहीत.

मी जे बोललो त्यावर मी ठाम आहे. जसे त्यांच्यासोबत नेते होते तसे माझ्यासोबतही होते. जर ते नाणार कुणी मागणी केली तर आणू म्हणत असतील, तर मग ते कलम ३७० पण परत लावतील. निकाल राम मंदिराच्या बाजूने लागला तर त्याचं श्रेय न्यायालयाचं असेल, सरकारचं नाही.

चर्चेला माझे दरवाजे कधीही बंद नव्हते. त्यांनी माझ्यावर खोटेपणाचा आरोप केला म्हणून चर्चा बंद केली. बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा कधीही खोटं बोलू शकत नाही.

मी अजूनही काँग्रेस राष्ट्रवादीशी चर्चा केलेली नाही. जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी माझी ओळख करुन द्यावी कारण अहमद पटेल यांच्याशी गडकरींची ओळख आहे. प्रफुल्ल पटेल यांच्याशी अमित शाह यांची ओळख आहे.

खोटेपणासोबत मला कोणतंही नातं ठेवायचं नाही. जे वचन मी बाळासाहेब ठाकरेंना वचन दिलं ते मी पूर्ण करणारच. एक दिवस शिवसेनेचा मुख्यमंत्री करणारच. यांना दुष्यंत चौटाला चालतात, उदयनराजेंकडून पगडी घालून घेतात आणि आम्हाला टोप्या घालतात. मीही कधीही अटलजी किंवा अडवाणी यांच्यावर कधीही टीका केलेली नाही. मोदी आणि शाह यांच्यावर पण व्यक्तिगत टीका केलेली नाही, धोरणांवर टीका केली आहे. ज्यांना खरेपणाची किंमत नाही ते हिंदtच असू शकत नाही. मग हे खोटे हिंदू आहेत.

महाराष्ट्रात भीषण स्थिती आहे. मी शिवसेनेच्या नेत्यांना मदतीची केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. कर्जमाफी कागदावर झाली आहे. दुष्काळाचे निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे आलेलेच नाहीत.

मी कोठेही सरकार स्थापन करण्याचा दावा केलेला नाही. मी जे ठरलं त्याच्यापेक्षा अधिक काहीही नको असंच म्हटलं आहे. मला आता संघाला विचारायचं आहे की खोटं बोलणारे लोक तुमच्या हिंदुत्वात बसतात. हे खोटारडे लोक कोणत्या तोंडाने रामाचं नाव घेणार आहेत. महाराष्ट्राने ठरवायचं आहे त्यांना खरं बोलणारे लोक हवे की खोटं बोलणारे हवेत?

आमच्या घराण्यात आम्ही कधीही खोटं बोललेलो नाही. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी याची काळजी घेऊ नये.

हिंदुत्वाचा बुरखा घालून जर कुणी खोटं बोलत असेल तर ते हिंदुत्व आहे का? हे मुफ्ती मोहम्मद यांच्याशी, नितीशकुमार, पासवान यांच्यासोबत जाता. नवाज शरिफ यांच्या वाढदिवसाला जातात हे चालतं का?

महाराष्ट्राच्या जनतेचा जितका बाळासाहेब ठाकरे, त्यांच्या कुटुंबावर विश्वास आहे तेवढा अमित शाह आणि कंपनीवर नाही.

 मुख्यमंत्री काय म्हणाले?

शिवसेनेने भाजपशी संवाद न करता, केवळी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबतच संपर्क साधल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. उद्धव ठाकरेंनी पहिल्या पत्रकार परिषदेत सरकार बनवण्याचे सर्व मार्ग खुले असल्याचं म्हटलं. तो आमच्यासाठी मोठा धक्का होता,  माझ्यासमोर अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाची बोलणी ठरली नव्हती. असं असलं तरी युती तुटली नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. या सर्व पार्श्वभूमीनंतर उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेकडे लक्ष लागलं.

LIVETV

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI