UPSC Prelim परीक्षा लांबणीवर, लोकसभा निवडणुकीचा परिणाम, आता होणार या तारखेला परीक्षा

UPSC नागरी सेवा परीक्षा (प्रिलिम) 2024 ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लोकसभा निवडणुकीमुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) पूर्वपरीक्षा पुढे ढकलली आहे. ही परीक्षा 26 मे 2024 रोजी देशभरातील नियुक्त परीक्षा केंद्रांवर प्रस्तावित होती.

UPSC Prelim परीक्षा लांबणीवर, लोकसभा निवडणुकीचा परिणाम, आता होणार या तारखेला परीक्षा
upsc examImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Mar 19, 2024 | 9:17 PM

नवी दिल्ली | 19 मार्च 2024 : निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. देशात सात टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार आहेत, मात्र, लोकसभा निवडणुकीचा पहिला फटका केंद्रीय लोकसेवा आयोगाला बसला आहे. लोकसभा निवडणुकीमुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा प्राथमिक (CSE) परीक्षा 2024 पुढे ढकलली आहे. ही परीक्षा पूर्वी 26 मे रोजी होणार होती. मात्र, आता ही परीक्षा 16 जून 2024 रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठी उमेदवारांचे प्रवेशपत्र परीक्षेच्या काही दिवस आधी ऑनलाइन जारी केले जाणार आहेत.

UPSC नागरी सेवा परीक्षा (प्रिलिम) 2024 ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसेवा आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) पूर्वपरीक्षा पुढे ढकलली आहे. ही परीक्षा 26 मे 2024 रोजी देशभरातील नियुक्त परीक्षा केंद्रांवर प्रस्तावित होती. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यामुळे या परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आयोगाने आपल्या वेबसाइटवर ही माहिती दिली आहे.

आता या तारखेला होणार परीक्षा

UPSC ने दिलेल्या माहितीनुसार आता सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिमरी (CSE) परीक्षा 26 मे 2024 ऐवजी 16 जून 2024 रोजी घेतली जाईल. या परीक्षेची अर्ज प्रक्रिया 14 फेब्रुवारी ते 6 मार्च 2024 या कालावधीत पूर्ण झाली होती. या परीक्षेत सहभागी होण्यासाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना परीक्षेच्या तारखेच्या काही दिवस आधी प्राथमिक परीक्षेत बसण्यासाठी प्रवेशपत्रे दिली जातील. अधिकृत वेबसाइटला भेट देऊन आणि आवश्यक तपशील भरून उमेदवार केवळ ऑनलाइन मोडद्वारे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील. उमेदवारांची प्रवेशपत्रे इतर कोणत्याही माध्यमातून पाठवली जाणार नाहीत असेही आयोगाने कळविले आहे.

इतक्या पदांवर भरती होणार

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत एकूण 1206 रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. यापैकी 1056 पदे भारतीय प्रशासकीय सेवा / IAS (नागरी सेवा) साठी आरक्षित आहेत. तर, 150 पदे भारतीय वन सेवेसाठी (IFS) राखीव आहेत. UPSC CSE प्रीलिम परीक्षा 2024 शी संबंधित इतर माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात असेही आयोगाने कळविले आहे.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.