कुष्टरोग्यांपासून हातावर पोट असणाऱ्या मजूरांपर्यंत घरपोच जीवनावश्यक वस्तू, ‘वोपा’ संस्थेचा ‘लाख’मोलाचा पुढाकार

मजूर, विधवा महिला आणि रोजंदारी करुन घर चालवणाऱ्यांवर नामुष्की ओढावली. हीच परिस्थिती लक्षात घेऊन पुण्यातील ‘वोवेल्स ऑफ द पीपल असोसिएशन’ (वोपा) ही संस्था पुढे आली आहे (Relief work for poor families amid corona by VOPA).

कुष्टरोग्यांपासून हातावर पोट असणाऱ्या मजूरांपर्यंत घरपोच जीवनावश्यक वस्तू, 'वोपा' संस्थेचा ‘लाख’मोलाचा पुढाकार
Follow us
| Updated on: Apr 07, 2020 | 7:40 PM

मुंबई : मागील अनेक दिवसांपासून कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आला. अचानक जमावबंदी आणि संचारबंदी लागू झाल्यानं याचा सर्वात मोठा परिणाम राज्यातील हातावर पोट भरणाऱ्या मजूरांवर पडला. त्यामुळे रोजगाराच्या अभावातून मजूर, विधवा महिला आणि रोजंदारी करुन घर चालवणाऱ्यांवर नामुष्की ओढावली. हीच परिस्थिती लक्षात घेऊन पुण्यातील ‘वोवेल्स ऑफ द पीपल असोसिएशन’ (वोपा) ही संस्था पुढे आली आहे (Relief work for poor families amid corona by VOPA). या संस्थेने बीड आणि अहमदनगरमधील अनेक गरजू कुटुंबांना पुढील 10 दिवसांसाठीच्या जीवनावश्यक वस्तू घरपोच केल्या आहेत. यामुळे या कुटुंबांना लॉकडाऊनच्या काळात तग धरुन राहण्यास मोठा आधार मिळाला आहे.

वोपा संस्थेने बीडमध्ये सोनदरा येथील गुरुकुलच्या मदतीने तर अहमदनगर येथे स्नेहालय संस्थेच्या मदतीने लोकवर्गणीतून जवळपास अडीच ते तीन लाख रुपयांचा मदत निधी जमा केला. यातून बीडमधील 250 गरजू कुटुंबांना प्रत्येकी 10 दिवसांसाठीच्या अन्नधान्याची मदत करण्यात आली. यात आंबाजोगई येथील 50 कुटुंबांचाही यात समावेश आहे. गव्हाचे पीठ, तांदूळ, तूरडाळ, मसूर डाळ, बेसनपीठ, साखर, मीठ अशा जीवनावश्यक अन्न पदार्थांची पाकिटे या गरजू कुटुंबांना देण्यात आली आहेत.

वोपा आणि स्नेहालय संस्थेच्या मदतीने अहमदनगरमधील लालबत्ती भाग, संजयनगर झोपडपट्टी या भागातील कुष्ठरोगी, रोजंदारीवर काम करणारे मजूर, भिल्ल वस्तीतील हातमजूर यांना देखील जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. जवळपास 1 लाख 60 हजार रुपयांच्या रकमेतून जवळपास 60 कुटुंबांना 1 महिन्याचा शिधा पोचवण्यात आला. यात प्रत्येक कुटुंबाला गरजेनुसार एकावेळी 275 रुपयांचा शिधा मिळत आहे. यात 2 किलो तांदूळ, 1 किलो साखर, 0.5 किलो डाळ, 0.25 किलो बेसनपीठ, 0.5 किलो गोडतेल, 2 किलो गव्हाचे पीठ, 1 मसाला पाकीट, 1 मीठ, मिरची पाकीट अशा वस्तूंचा समावेश आहे. 4 ते 5 व्यक्तींच्या एका कुटुंबाला, एका महिन्यात असे साधारण 10 शिधा पाकिटे लागतात. म्हणजे एका कुटुंबाचा एक महिन्याचा खर्च अंदाजे 2 हजार 750 रुपये आहे, अशी माहिती वोपाचे संचालक प्रफुल्ल शशिकांत यांनी दिली.

या मदत कार्याविषयी बोलताना प्रफुल्ल शशिकांत म्हणाले, ‘मागील 2 वर्षांपासून आम्ही या भागातील मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी काही प्रयत्न करतो आहोत. ते काम सुरु असतानाच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनने हातावर पोट असणाऱ्या अनेक कुटुंबांची अडचण केली आहे. अशावेळी आम्ही अहमदनगरमध्ये स्नेहालय संस्थेच्या मदतीने आणि बीडमध्ये गुरुकुल संस्था व पोटभरे सरांच्या मदतीने गरजू कुटुंबांना मदतीचं काम करण्याचा निर्णय घेतला. यापुढील काळात देखील लोकवर्गणीच्या माध्यमातून अधिकाधिक गरजुंना मदत करण्याचा आमचा प्रयत्न असेल.’

“हातावर पोट असणाऱ्यांची स्थिती पाहून मन सुन्न”

हातावर पोट भरणाऱ्या कुटुंबांचे या काळातील परिस्थितीचे विदारक रुप पाहूनच आपण हे मदत कार्य सुरु केल्याची भावना वोपा या संस्थेने व्यक्त केली. वोपाचे संचालक प्रफुल्ल शशिकांत म्हणाले, “कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याच्या पार्श्वभूमीवर वोपा टीमने रोजंदारीवर गुजराण करणाऱ्या गरीब लोकांना मदत करण्याचं नागरिकांना आवाहन केलं होतं. अहमदनगरच्या लालबत्ती भागात काम करणाऱ्या महिला, त्यांची मुले, संजयनगर झोपडपट्टीत राहणारे कुष्ठरोगी, गरीब कुटुंबे, भिल्ल वस्तीतील हातमजूर लोक, हे सर्व या कठीण परिस्थितीत कसे जगात असतील हा विचार डोक्यात आला तरी सुन्न व्हायला होत होतं. या सर्व लोकांसाठी या कठीण प्रसंगात आपण सर्वांनी मिळून खारीचा वाटा उचलला पाहिजे या भावनेतूनच हे काम सुरु झालं. पुढे लोकवर्गणीतून अहमदनगरसाठी सुमारे 1 लाख 60 हजार रुपये जमा झाले. नागरिकांनी इतक्या कमी वेळेत दिलेला हा प्रतिसाद खूप सकारात्मक होता. यामुळे पुढील मदत कामासाठी देखील ऊर्जा मिळाली.”

वोपाचं नागरिकांना आवाहन

अहमदनगर शहरातील विविध 8 वस्त्यांमधील 400 कुटुबांना मदतीची गरज आहे. स्नेहालय संस्थेचे संजय गुगळे आणि त्यांचे सहकारी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत या वंचितांना अहोरात्र मदत करत आहे. त्यासाठी पुढील 1 महिन्याचा खर्च साधारण 11 लाख रुपयांचा आहे. गरज मोठी आहे आणि कदाचित बऱ्याच काळासाठी लागणार आहे. पण सर्वांनी एकत्र येऊन ही मदत उभी करण्याचा मनोदय आहे. आपणही या मदत कामात आपलं योगदान द्यावं, असं आवाहन वोपा संस्थेनं केलं आहे. आपण सगळे मिळून आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या हालअपेष्टा काही प्रमाणात तरी कमी करु शकतो, असा आम्हाला विश्वास आहे. तुमच्या मदतीमुळे अजून जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळाली. तुमच्या साथीने हे काम पुढे जात राहील आणि आपण अशा संकटांवर मात करता येईल, असा विश्वासही यावेळी प्रफुल्ल शशिकांत यांनी व्यक्त केला.

बीडमध्ये जिल्हाधिकारी रेखावार यांच्यासह स्थानिक प्रशासनाचं महत्त्वाचं सहकार्य

वोपाच्या मदत कामात बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार व मुख्य कार्यकारी अधिकारी कुंभार यांचं महत्त्वाचे सहकार्य झाल्याचं वोपा संस्थेनं सांगितलं. वोपासोबत सोनदरा गुरुकुलम या सामाजिक संस्थेकडून अश्विन भोंडवे व रज्जाक पठाण यांनी बीडमधील सर्व काम पाहिलं. या कामात जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश आघाव व तहसीलदार आंबेकर यांनी व्यक्तिगत लक्ष दिलं, त्याबद्दल संबंधित सामाजिक संस्थांनी त्यांचे विशेष आभार मानले. आंबेजोगई येथे जेष्ठ समाजसेवक कॉम्रेड बब्रुवाहन पोटभरे, निवृत्त अधिकारी चंद्रकांत वडमारे यांच्यासह रोहित खिंडरे, डॉ. चामनार आणि विशाल पोटभरे यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.

वोपा संस्थेविषयी

वोपा ही संस्था मागील 2 वर्षांपासून मराठवाड्यातील ग्रामीण शाळांचा विकास व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षक प्रशिक्षण या क्षेत्रात कार्यरत आहे. केळकर समितीच्या अहवालानुसार मराठवाड्याचा शैक्षणिक विकास इतर भागाच्या तुलनेत बराच कमी आहे. हाच मुद्दा लक्षात घेऊन वोपा संस्था जिल्ह्यातील शिक्षणात सुधारणा करण्यासाठी बीड भागात काम करत आहे. मात्र कोरोना विषाणूच्या संसर्गाने राज्यावर आलेल्या संकटाची ही स्थिती ओळखून वोपा संस्थेने आपल्या मुख्य कामाला बाजूला ठेऊन डोमरी येथील सोनदरा गुरुकुलच्या मदतीने गरजू कुटुंबांना सहाय्य करण्यासाठी पुढाकार घेतला. वोपाने आपल्या मुख्य शैक्षणिक कामाला बाजूला ठेऊन वंचितांच्या पोटाचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतल्याने नागरिकांकडून संस्थेचं कौतुक होत आहे.

संबंधित बातम्या :

Lockdown : 500 किमीची पायपीट, चालून चालून थकलेल्या 23 वर्षीय तरुणाचा निवारागृहात मृत्यू

8 महिन्यांची गर्भवती, पतीसोबत अन्न-पाण्याविना 100 किमीपर्यंत पायपीट

Lockdown : चिमुकल्याला कडेवर उचलून ‘हिरकणी’चा प्रवास, बाळाच्या उपचारासाठी आईची 30 किमी पायपीट

VIDEO : उत्तर प्रदेशात रोगापेक्षा इलाज भयंकर, पायपीट करणाऱ्या मजुरांवर एकत्र बसवून औषध फवारणी

Relief work for poor families amid corona by VOPA

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.