VIDEO : चायनामधील दुकानातील स्फोट पाहा, थरकाप उडेल!

बिजींग : चीनमध्ये धातू काम करणाऱ्या एका दुकानात अचानक मोठा स्फोट होऊन आगीचा भडका उडाला. या भीषण स्फोटामुळे 9 जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचा थरारक व्हिडीओ सध्या जगभर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ एका परदेशी वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. ही घटना मंगळवारी 7 नोव्हेंबर 2018 रोजी चीन येथील […]

VIDEO : चायनामधील दुकानातील स्फोट पाहा, थरकाप उडेल!
सचिन पाटील

|

Jul 05, 2019 | 5:02 PM

बिजींग : चीनमध्ये धातू काम करणाऱ्या एका दुकानात अचानक मोठा स्फोट होऊन आगीचा भडका उडाला. या भीषण स्फोटामुळे 9 जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचा थरारक व्हिडीओ सध्या जगभर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ एका परदेशी वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

ही घटना मंगळवारी 7 नोव्हेंबर 2018 रोजी चीन येथील शेन्झेन शहरात घडली. सीसीटीव्हीमुळे हा भयंकर प्रकार कॅमेरात कैद झाला. धातू काम करणाऱ्या दुकानात आग लागल्याने दुकानातील कर्मचारी आणि दुकानाबाहेरील काहीजण जखमी झाले आहेत. स्फोट झाल्यानंतर अचानक काय झालं हे त्यांना कळालंही नाही. अचानक स्फोटामुळे आग लागली आणि या आगीत 9 जण जखमी झाले. सध्या त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हा स्फोट नेमका कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेलं नाही.

मात्र या थरारक व्हिडीओमध्ये घटनेचं गांभीर्य दिसून येतं. या व्हिडीओत स्फोट झाल्यानंतर दुकानाबाहेरील माणसंही पळताना दिसत आहे. आगीचा भडका इतका मोठा होता की तो दुकाना बाहेर आला. दरम्यान आगीनंतर लगेचच अग्निशमन दलाला घटनास्थळी बोलावण्यात आलं. काही वेळानंतर अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश आलं.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें