AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मराठा विद्यार्थ्यांना डावलून भरती प्रक्रिया होऊ देणारच नाही, वेळ पडल्यास जशास तसे उत्तर देऊ’

ओबीसी नेते चुकीची वक्तव्ये करुन समाजातील वातावरण खराब करत आहेत. | government job recruitment

'मराठा विद्यार्थ्यांना डावलून भरती प्रक्रिया होऊ देणारच नाही, वेळ पडल्यास जशास तसे उत्तर देऊ'
आबासाहेब पाटील, मराठा क्रांती ठोक मोर्चा
| Updated on: Oct 30, 2020 | 6:59 PM
Share

नवी मुंबई: कोणत्याही परिस्थितीत मराठा विद्यार्थ्यांना डावलून भरती प्रक्रिया होऊ देणार नाही. वेळ पडल्यास उत्तराला उत्तर देऊ, असे वक्तव्य मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी केले. राज्याचे मंत्री आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा समाजासाठी इतरांवर अन्याय नको, अशी भूमिका घेतली होती.  राज्य सरकारने मराठा समाजाच्या जागा वगळून नोकरभरती सुरु करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. (Maratha kranti thok morcha conveyor Abasaheb Patil reply on OBC leaders comment)

या पार्श्वभूमीवर आबासाहेब पाटील यांनी शुक्रवारी नवी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांच्यासह ओबीसी समाजाच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले. ओबीसी समाजाचे नेते चुकीची वक्तव्ये करुन समाजातील वातावरण खराब करत आहेत. मराठा विद्यार्थ्यांना डावलून भरती प्रक्रिया होऊ देणार नाही . ओबीसी नेत्यांनी सर्वसमावेशक भूमिका घ्यावी. मराठा विद्यार्थ्यांच्या जागा बाजूला ठेवून नोकरभरती होऊ देणार नाही. वेळ पडल्यास उत्तराला उत्तर देऊ, असा थेट इशारा आबासाहेब पाटील यांनी दिला. त्यामुळे आता मराठा आणि ओबीसी नेत्यांमधील शाब्दिक युद्ध तापण्याची चिन्हे आहेत.

काय म्हणाले होते विजय वडेट्टीवार? OBC समाजाने रस्त्यावर भीक मागत फिरायचं का?, असा थेट सवाल मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांनी केला होता. मराठा समाजाच्या जागा बाजूला ठेवून इतर नोकरभरती सुरू करा. मराठा समाजावर अन्याय नको, पण ओबीसींवरही अन्याय नको. नोकरीभरतीसाठी ओबीसी समाज रस्त्यावर उतरला तर ते योग्यच आहे. नोकर भरतीसाठी ओबीसी तरुणांमध्ये असंतोष वाढत असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले होते.

फक्त मराठा समाज SEBC नाही, तर आम्हीसुद्धा SEBC आहोत- हरिभाऊ राठोड दुसरीकडे मराठा आरक्षणावर ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनीसुद्धा भाजपला धारेवर धरलं आहे. फक्त मराठा समाज SEBC नाही, तर आम्हीसुद्धा SEBC आहोत. भटके, विमुक्त, बारा बलुतेदार, धनगर हे सगळे SEBC आहेत, असं ओबीसी नेते हरिभाऊ राठोड म्हणाले आहेत. मोदी साहेबांनी घटनादुरुस्तीत ओबीसीची टर्म काढून टाकली. तसंही आम्ही SEBC होतो आणि आताही आहे, पण मधल्या काळात भाजपानं लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केला, असा घणाघात हरिभाऊ राठोड यांनी भाजपवर केला आहे.

SEBC चा लाँग फॉर्म कधी दिला नाही. मराठ्यांना आम्ही SEBC देतो म्हणजे काही तरी वेगळं देतो असं ते सांगत होते. पण मधल्या काळात भाजपानं लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केला. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी आरक्षण हे लोकसंख्येनुसार सगळ्यांना देता येईल, असे वक्तव्य केले. मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचे असल्यास लोकसंख्येची गणना करावी लागेल, आपल्याला 2021च्या लोकसंख्येच्या गणनेची वाट बघायची गरज नाही. आपण आठ दिवसांतही लोकसंख्येची गणना करू शकतो, असेही हरिभाऊ राठोड यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

OBC समाजाने रस्त्यावर भीक मागत फिरायचं का?; विजय वडेट्टीवारांचा सवाल

विजय वडेट्टीवारांच्या भूमिकेला भाजपचं समर्थन, ‘त्या’ जागा बाजूला ठेवून नोकरभरतीची मागणी

(Maratha kranti thok morcha conveyor Abasaheb Patil reply on OBC leaders comment)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.