फेसबुक लाईव्ह करत बाईकवर स्टंटबाजी, 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू

स्पोर्ट्स बाईकवरुन फेसबुक लाईव्ह करणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं (Bike accident in kolkata) आहे.

फेसबुक लाईव्ह करत बाईकवर स्टंटबाजी, 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू


कोलकाता : स्पोर्ट्स बाईकवरुन फेसबुक लाईव्ह करणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं (Bike accident in kolkata) आहे. पश्चिम बंगालमध्ये कोलकाता शहरात राहणाऱ्या एका 24 वर्षीय तरुणाला जीव गमवावा लागला आहे. चंचल ढिबोर असे या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंचल हा बाईक चालवत असताना फेसबुक लाईव्ह करत होता. बाईकचा वेग जास्त असल्याने चंचलचा त्याला गाडीचा बॅलेन्स बिघडला. त्यानंतर अवघ्या क्षणार्धात त्याचा अपघात झाला. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला.

यानंतर काही जणांनी चंचलला लगेचच रुग्णालयात दाखल केले. मात्र डोक्याला गंभीर मार लागल्याने बराच रक्तस्त्राव झाला होता. त्यामुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

चंचलच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (15 फेब्रुवारी) जवळच्या काली मातेच्या मंदिरातून दर्शन करुन घरी परतत असताना हा अपघात झाला. यादरम्यान तो फेसबुकवर लाईव्ह करत होता. मात्र पुढील काही सेकंदातच त्याचा बॅलेन्स बिघडला. त्यानंतर त्याचा भीषण अपघात झाला. त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू (Bike accident in kolkata) झाला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI