AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona | जनता कर्फ्यू : घरी राहून करण्यासारखी 10 कामं

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या 22 मार्च रविवारी जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे.

Corona | जनता कर्फ्यू : घरी राहून करण्यासारखी 10 कामं
| Updated on: Mar 21, 2020 | 3:55 PM
Share

मुंबई : देशात सध्या कोरोना विषाणूने (What To Do In Quarantine) धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत देशात या विषाणूमुळे 285 नागरिकांना संसर्ग झाला आहे. तर या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 6 हजार 700 लोकांना क्वारंटाईन केलं आहे. तसेच, देशभरातील अनेक शहरांमध्ये सध्या लॉक (What To Do In Quarantine) डाऊनसारखी परिस्थिती आहे.

त्या त्या राज्याच्या प्रशासनाने नागरिकांना गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे देशातील बरेच नागरिक सध्या घरी आहेत. काही वर्क फ्रॉम होम करत आहेत तर काहींना सुट्टी देण्यात आली आहे. शाळा कॉलेजांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

हेही वाचा : PM MODI : 22 मार्चला ‘जनता कर्फ्यू’, सकाळी 7 ते रात्री 9 कोणीही घराबाहेर पडू नका : पंतप्रधान मोदी

सध्या देशात इटली आणि इतर देशांप्रमाणे संपूर्ण लॉक डाऊन करण्यात आलेलं नसलं, तरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या 22 मार्च रविवारी जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे.

22 मार्चला जनता कर्फ्यू

देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे देशातील जनतेला 8 वाजता संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 22 मार्चला जनता कर्फ्यू (Janta Curfew ) पाळा असे आवाहन केले. यावेळी “सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत कोणीही घराबाहेर पडू नका, अत्यंत आवश्यक असेल, पर्याय नसेल तरच त्या दिवशी घराबाहेर पडा,” असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

आता या काळादरम्यान सुट्टी असली तरीही तुम्ही घरातून कुठेही बाहेर पडू शकत नाही. तुम्हाला पूर्णवेळ घरातच थांबायचं आहे. त्यामुळे काही काम नसल्याने कंटाळा येणं, बोअर होणं स्वाभाविक आहे. त्यातच जर रोज शाळा, कॉलेज किंवा ऑफिसला जायची सवय असेल तर इतके दिवस घरात कैद राहाणं कठीणच. त्यामुळे तुमचा वेळ घालवायसाठी आम्ही काही अशी कामं शोधली आहेत, ज्यामुळे तुम्हाला कंटाळाही येणार नाही आणि तुम्ही घरी एन्जॉय करु शकाल.

1. मित्रांना, नातेवाईकांना व्हिडीओ कॉल करा

जसे तुम्ही घरी आहात, तसेच तुमचे मित्र, नातेवाईकही घरी असतील. ते देखील असेच घरी राहून कंटाळले असतील. तेव्हा तुम्ही त्यांना व्हिडीओ कॉल करु शकता. तुम्ही ग्रुप व्हिडीओ कॉल करुन एकाच वेळी तुमच्या सर्व मित्रमंडळींसोबत गप्पा मारु शकता. तसेही रोजच्या धावपळीच्या आयुष्यात मित्रांसोबत गप्पा मारणे जरा अवघड असते. तर हा वेळ तुम्ही तुमच्या मित्रमंडळी किंवा नातेवाईकांसोबत घालवू शकता.

2. नेहमी अपूरी राहाणार झोप पूर्ण करा

तुम्ही झोप घेऊ शकता. रोज ऑफिस असल्याने अनेकांची ही तक्रार असते की त्यांची झोप पूर्ण होत नाही. तर या काळात तुम्ही तुमची ती अनेक वर्षांची झोप पूर्ण करु शकता. यामुळे तुमचा मेंदू रिफ्रेश होईल आणि तुम्हाला कंटाळा येणार नाही.

3. चित्र काढा, पेंटिंग करा

तुम्हाला जर कधीकाळी लहानपणी चित्रकलेची आवड असेल. पण, आजच्या धकाधकीच्या जीवनात तुम्ही ती आवड कुठेतरी मागे सोडून आला असाल. तर हीच ती वेळ आहे, जेव्हा तुम्ही तुमच्यातल्या त्या कलाकाराला पुन्हा एक संधी देऊ शकता. तुम्हाला जसं येत असेल, तसं चित्र काढा आणि ते फ्रेम करुन तुमच्या खोलीत लावा. यामुळे तुम्हाला नक्कीच एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल.

4. स्वत: मीम्स बनवण्याचा प्रयत्न करा

मीम्स कोणाला नाही आवडत. आजच्या सोशल मीडियाच्या काळात मीम्स हे एक करमणुकीचं साधन झालं आहे. पण, इतरांनी बनवलेले मीम्स पाहून नुसतच हसण्याऐवजी स्वत: एखादं मीम बनवून पाहा. यामुळे तुम्हाला तुमच्यातील खोडकर, विनोदी स्वभावाची ओळख होईल.

5. पुस्तकं वाचण्याचा छंद जोपासा

अनेकांना पुस्तकं वाचण्याचा छंद असतो. (What To Do In Quarantine) मात्र, ऑफिस आणि दुनियादारीमध्ये अनेकदा आपला हा छंद कुठल्यातरी शेल्फच्या कोपऱ्यात धूळ खात पडलेला असतो. ती धूळ झटका आणि तुमचा तो छंद नव्याने जोपासा. तुमच्या आवडीचं पुस्तकं वाचा, यामुळे तुम्हाला जराही कंटाळा येणार नाही.

6. स्वत: स्वयंपाक करा, करायला शिका

स्वयंपाक करा, करायला शिका. कोरोनामुळे अनेकांनी त्यांच्या घरच्या काम करणाऱ्या महिलांनाही सुट्टी दिली आहे. त्यामुळे हीच वेळ आहे तुमच्यातील त्या लपलेल्या शेफला बाहेर आणण्याची. नवीन पदार्थ बनवायला शिका, वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करा आणि आपल्या कुटुंबासोबत स्वत: बनवलेल्या जेवणाचा आस्वाद घ्या.

7. घराची सेटिंग बदला, घराला एक नवं लूक द्या

कामाच्या व्यस्ततेत आपण आपल्या घरात कमीच लक्ष देऊ शकतो. त्यामुळे अनेक काळापासून घरात कुठलेही बदल होत नाहीत. कधीतरी वेळ मिळेल तेव्हा करु, असं म्हणत आपण ते टाळत असतो. मात्र, आता तुमच्याकडे वेळच वेळ आहे. तुम्ही तुमच्या घराची सेटिंग चेंज करु शकता. घराला एक नवीन लूक देऊ शकता. यामुळे तुम्हाला तुमचंच घर नवीन वाटेल आणि वेळ निघून जाईल.

8. योगा, झुंबा, व्यायाम करा

फिट राहायचा प्रयत्न करा. रोजच्या व्यस्त आयुष्यात बऱ्याचदा आपल्याला स्वत:कडे लक्ष द्यायला वेळ नसतो. आता वेळ आहे, मग तो स्वत:ला फिट ठेवण्यात का नाही घालवायचा? तुम्ही योगा करु शकता, झुंबा करु शकता, नवीन व्यायाम शिकू शकता.

9. कुटुंबासोबत वेळ घालवा

कुटुंबासोबत वेळ घालवा. आज कुणीही असो, कामात सर्वच इतके व्यस्त असतात की त्यांना त्यांच्या कुटुंबासोबत वेळ घालवायला बहाने शोधावे लागतात. मात्र, आता तुम्हाला बहाने शोधायची गरज नाही. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत निवांत वेळ घालवू शकता.

10. राहिलेली मालिका, वेब सिरीज, सिनेमे पाहा

कामाच्या व्यस्ततेत अनेक कामं राहून जातात. अनेक मालिका, वेब सिरीज, सिनेमे पाहायचे राहून जातात. या वेळेत तुम्ही ती राहिलेली सर्व कामे पूर्ण करु शकता.

हे सर्व पर्याय निव्वळ तुमचा कंटाळा घालवण्यासाठी आहे. पण, कोरोना या विषाणूला पसरण्यापासून थांबवायचं (Janta Curfew ) असेल, तर घरात राहाणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे या “जनता कर्फ्यू”ला कुणीही घराबाहेर पडू नका. सरकारच्याआदेशांचं पालन करा, तेव्हाच आपण या ‘कोरोना‘ नावाच्या (What To Do In Quarantine) असूरावर मात करु शकू.

संबंधित बातम्या :

Corona Virus Confirm Cases | देशात 285 कोरोना रुग्ण, कोणत्या राज्यात किती? संपूर्ण यादी

रेल्वेतून प्रवास केलेल्या 12 जण कोरोना पॉझिटिव्ह, कोरोनाचं संकट वाढलं

‘कोरोना’ग्रस्त गायिका कनिका कपूरसोबत पार्टी, वसुंधरा राजे-दुष्यंत सिंहही ‘क्वारंटाईन’

पंतप्रधान मोदींची जनता कर्फ्यूची घोषणा, जनता कर्फ्यू म्हणजे काय?

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.