Corona Virus Confirm Cases | देशात 285 कोरोना रुग्ण, कोणत्या राज्यात किती? संपूर्ण यादी

देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 285 वर पोहोचला आहे. तर या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 6 हजार 700 लोकांना क्वारंटाईन केलं (Corona Virus Confirm Cases) आहे.

Corona Virus Confirm Cases | देशात 285 कोरोना रुग्ण, कोणत्या राज्यात किती? संपूर्ण यादी

नवी दिल्ली : देशभरात कोरोना व्हायरसचा हाहा:कार पाहायला (Corona Virus Confirm Cases) मिळत आहे. देशात विविध राज्यात शनिवारी (21 मार्च) कोरोनाची लागण झालेले 50 नवे रुग्ण आढळले. यामुळे शनिवारी सकाळी देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 285 वर पोहोचला आहे. तर या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 6 हजार 700 लोकांना क्वारंटाईन केलं आहे.

देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा हा शुक्रवारी (20 मार्च) 250 इतका (Corona Virus Confirm Cases) होता. मात्र शनिवारी या आकड्यांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याने ही संख्या 285 झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली. यात 32 विदेशी रुग्णांचा समावेश असून 17 इटालियन, 3 फिलिपीन्स, 2 ब्रिटेन तर प्रत्येकी एक कॅनडा, इंडोनेशिया आणि सिंगापूरचे रहिवाशी आहेत. तर आतापर्यंत दिल्ली, कर्नाटक, पंजाब आणि महाराष्ट्र या चार राज्यात एका रुग्णाचा मृत्यूही झाला आहे.

दरम्यान देशभरातील सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 63 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात पुण्यात 22 तर मुंबईत 21 कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

काल दिवसभरात 11 रुग्ण वाढले. यामध्ये 10 रुग्ण मुंबईचे तर 1 पुण्याचा नवा रुग्ण आढळला आहे. यापैकी तिघांना संपर्क आल्यामुळे तर परदेशातून आलेल्या 8 जणांना लागण झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्य कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण (भारतीय)कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण (विदेशी) डिस्चार्ज मृत्यू
दिल्ली 16121
हरियाणा414
केरळ 3373
राजस्थान2123
तेलंगाणा1091
उत्तर प्रदेश2219
लडाख10
तमिळनाडू31
जम्मू-काश्मीर4
पंजाब61
कर्नाटक1511
महाराष्ट्र5931
आंध्रप्रदेश3
उत्तराखंड 3
ओडिशा2
पश्चिम बंगाल2
छत्तीसगड1
गुजरात9
पाँडेचरी1
चंदीगड5
मध्यप्रदेश 4
हिमाचल प्रदेश2
23638234

संबंधित बातम्या

Corona Virus | मुंबई, पुणे, नागपुरातील व्यवहार ठप्प, राज्यातील 10 शहरं लॉक डाऊन

Corona Virus | पुण्यातील सर्व पेट्रोल पंप दुपारनंतर बंद, पेट्रोल डीलर्सचा बंदला अर्धवेळ पाठिंबा

Published On - 1:08 pm, Sat, 21 March 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI