विधवा महिलांकडून बीडमध्ये मकर संक्रांती मोठ्या उत्साहात साजरी

सौभाग्यवती महिलेकडून मकर संक्रांत आणि वटपौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहात साजरा (Widow women celebrate makar sankrant) केला जातो.

विधवा महिलांकडून बीडमध्ये मकर संक्रांती मोठ्या उत्साहात साजरी

बीड : सौभाग्यवती महिलेकडून मकर संक्रांत आणि वटपौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहात साजरा (Widow women celebrate makar sankrant) केला जातो. मात्र बीडमध्ये या परंपरेला छेद देत विधवा महिलांनी मकर संक्रांत साजरी केली आहे. त्यानिमित्ताने सामाजिक आणि सलोख्याचा एक आगळा वेगळा असा संदेश या महिलांकडून (Widow women celebrate makar sankrant) देण्यात आला आहे.

बीड तालुक्यातील पालवन या गावात जिल्हा परिषद शिक्षिका असलेल्या मनीषा ढाकणे हा सण साजरा करत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून परिसरातील विधवा महिलांना एकत्र करत त्या साजरा करतात. यंदा त्यांनी गावातील 105 विधवा महिलांना साडी चोळी देऊन तिळगुळाचे वाटप करत त्यांचा गौरव करुन एक आदर्श मकर संक्रांत साजरी केली.

आठ वर्षांपूर्वी मनीषा ढाकणे यांच्या पतीचे निधन झाले होते. त्या स्वतः शिक्षिका असल्या तरी समाजातील काही लोकांनी विधवा असल्याने त्यांना अनेक कार्यक्रमापासून दूरच ठेवलं होते. शिक्षित असून देखील स्वतःबद्दल अशी परिस्थिती आहे. मात्र ग्रामीण भागातील इतर विधवांचे काय हाल असतील हेच शिक्षिका ढाकणे यांना खटकलं आणि त्यांनी विधवा महिलांना सोबत घेऊन मकर संक्रांत सण साजरा करण्याचा संकल्प हाती घेतला.

ही अनिष्ठ रुढी परंपरा बंद व्हावी यासाठी शिक्षिका मनीषा ढाकणे यांनी पुढाकार घेत आज तब्बल 105 विधवांसोबत संक्रांत मोठ्या उत्साहात साजरा केला आहे. त्यामुळे सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.

Published On - 10:30 am, Wed, 15 January 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI