WTC Final Weather Update : भारत आणि न्यूझीलंडमधील सामना सुरु होण्याबाबत मोठी बातमी, बीसीसीआयने शेअर केले साऊथॅम्प्टनच्या खेळपट्टीचे फोटो

भारत आणि न्‍यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात होणाऱ्या अंतिम सामना दुसऱ्या दिवशी म्हणजे आजतरी सुरु होईल का? याकडे संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष लागून आहे. याबाबतच बीसीसीआयने एक फोटो पोस्ट करत मोठी माहिती दिली आहे.

WTC Final Weather Update : भारत आणि न्यूझीलंडमधील सामना सुरु होण्याबाबत मोठी बातमी, बीसीसीआयने शेअर केले साऊथॅम्प्टनच्या खेळपट्टीचे फोटो
साऊदम्पटनचे मैदान

साऊथॅम्प्टन : मागील दोन वर्षांपासून सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशिपच्या (ICC World Test Championship Final) अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसाने खोडा घातल्याने पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करावा लागला.  त्यामुळे भारत आणि न्‍यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात होणाऱ्या अंतिम सामना दुसऱ्या दिवशी म्हणजे आजतरी सुरु होईल का? याकडे संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष लागून आहे. दरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सामना पार पडणाऱ्या मैदानाच्या खेळपट्टीचे फोटो ट्विटरवरुन शेअर केले आहेत. (WTC Final 2021 India vs New Zealand play Abandoned Due To Rain second days Weather Updates and Pitch Photo Tweeted By BCCI from Southampton)

वरील फोटो शेअर करत त्याला पूर्णवेळ कव्हरखाली असल्यानंतर खेळपट्टी अशी दिसते आहे. यावर तुमचं काय मत? असं विचारत प्रेक्षकानांच कोड्यात टाकलं आहे. नेमका सामना कधी सुरु होणार ? याबद्दल काही नेमकी माहिती न देता खेळपट्टीचे फोटो टाकत प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.

आज सामना सुरु होण्याची दाट शक्यता

पहिल्या दिवशीचा खेळ रद्द झाल्यामुळे आजतरी सामना सुरु होतोका याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान कॉमेन्ट्रीसाठी तिथे उपस्थित असलेल्या दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) मैदानाचे ताजे फोटो शेअर केले आहेत. कार्तिकने शेअर केलेल्या फोटोमध्ये मैदानावर चांगल ऊन पडलं असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे असेच वातावरण राहिल्यास या बहुप्रतीक्षीत सामन्याला नक्की सुरुवात होईल.

हे ही वाचा :

WTC Final Weather Update : साऊथॅम्प्टनमधून आनंदाची बातमी, क्रिकेटपटूने शेअर केले ताजे फोटो, मॅचची वेळही बदलली

Ind vs NZ : पहिल्या दिवसाचा खेळ रद्द् झाल्यावर, खेळाडू रंगले ‘या’ खेळात, पाहा व्हिडीओ

WTC अंतिम सामन्यात भारताची बॅटिंग ऑर्डर कशी असेल? याअगोदर साऊथॅम्प्टन कुणाची कामगिरी कशी?

(WTC Final 2021 India vs New Zealand play Abandoned Due To Rain second days Weather Updates and Pitch Photo Tweeted By BCCI from Southampton)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI