AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ziva Dhoni | बाबांचा संघ जिंकावा म्हणून झिवा धोनीची प्रार्थना, IPL 2021 मधली Cute Moment!

महेंद्रसिंग धोनीची (MS Dhoni) मुलगी झिवा (Ziva Cute Photo) तिच्या वडिलांच्या विजयासाठी प्रार्थना करत असल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Ziva Dhoni | बाबांचा संघ जिंकावा म्हणून झिवा धोनीची प्रार्थना, IPL 2021 मधली Cute Moment!
Ziva Dhoni
| Edited By: | Updated on: Oct 05, 2021 | 1:37 PM
Share

नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीची (MS Dhoni) मुलगी झिवा (Ziva Cute Photo) तिच्या वडिलांच्या विजयासाठी प्रार्थना करत असल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो चाहत्यांना खूप आवडला आहे. हा फोटो आयपीएल 2021 मधील दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्जमधील (CSK विरुद्ध DC) सामन्यादरम्यानचा आहे. (Ziva Dhoni Praying For CSK’s Win Over DC, netizens Thinks So!)

धोनीची पत्नी साक्षी आणि त्यांची मुलगी झिवा हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये आल्या होत्या. दिल्लीला सामन्याच्या शेवटच्या 3 षटकांत विजयासाठी 28 धावांची गरज होती. दिल्लीने 6 गडी गमावले होते. सामन्याचा उत्साह वाढत होता. या दरम्यान, झिवाचा एक फोटो समोर आला, ज्यात तिचे दोन्ही हात जोडलेले होते आणि तिचे डोळे बंद होते. वडिलांच्या संघाच्या विजयासाठी ती प्रार्थना करत होती.

परंतु, झिवाची ही प्रार्थना कामी आली नाही, कारण या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्ज संघ पराभूत झाला. दिल्लीने 3 गडी राखून हा सामना खिशात घातला. मात्र झिवाच्या निरागसतेने सर्वांची मने जिंकली आणि क्रिकेट चाहत्यांना हे सुंदर चित्र सोशल मीडियावर शेअर करण्यापासून स्वतःला रोखता आले नाही.

दिल्लीची चेन्नईवर मात

दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळवलेल्या या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स (DC vs CSK) हे संघ आमने सामने होते. अत्यंत चुरशीचा झालेला हा सामना शेवटच्या ओव्हरपर्यंच गेला. पण अखेर दिल्लीने 3 गडी राखून गुणतालिकेत अव्वलस्थानी असलेल्या चेन्नईला मात देत सामना जिंकला. सामन्यात नाणेफेक जिंकत दिल्ली कॅपिटल्स संघाने गोलंदाजी निवडली होती. जो निर्णय दिल्लीने बरोबर करत चेन्नई संघाला अवघ्या 136 धावांत आटोपलं. दिल्लीकडून अक्षर पटेलने 2 तर आवेश खान, नॉर्खिया आणि आश्विन यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतला. पण सर्वच गोलंदाजनी अतिशय कमी धावा देत चेन्नईला 136 धावांवर रोखलं.

चेन्नईचे सलामीवीर फाफ डुप्लेसी आणि ऋतुराज गायकवाड यांनी संपूर्ण हंगामात अप्रतिम कामगिरी केली आहे. पण आजच्या सामन्यात दोघंही स्वस्तात तंबूत परतले. संपूर्ण संघात सर्वाधिक धावा अनुभवी खेळाडू अंबाती रायडूने केल्या. त्याने 5 चौकार आणि 2 षटकार ठोकत नाबाद 55 धावा झळकावल्या. त्याला धोनीने 18 धावांची मदत केली. तर उथाप्पाने देखील 19 धावा केल्या. ज्याच्या जोरावरच चेन्नईचा संघ किमान 136 धावा करुन दिल्लीसमोर 137 धावांचे आव्हान ठेवू शकला.

दिल्लीचा 3 विकेट्सनी विजय

सामन्याची खेळपट्टी गोलंदाजीच्या दृष्टीने उत्तम असल्याने दिल्लीचे बहुतेक फलंदाजही सामन्यात अपयशी ठरले. केवळ शिखर धवनने महत्त्वपूर्ण 39 धावा केल्या. ज्याला सुरुवातीला पृथ्वीने 18 आणि मध्यंतरी पंतने 18 धावांची साथ दिली. पण हे सगळे बाद झाल्यानंतर सामना चेन्नईच्या बाजूने झुकु लागला. पण वेस्ट इंडिजचा फलंदाज शिमरॉन हीटमायरने नाबाद 28 धावा ठोकत सामना दिल्लीच्या बाजूने वळवला. विशेष म्हणजे शेवटच्या 3 चेंडूत 2 धावांची गरज असताना फलंदाजीला आलेल्या रबाडाने चौकार लगावत सामना दिल्लीला 3 विकेट्सनी जिंकून दिला. या रोमहर्षक विजयानंतर दिल्लीच्या हीटमायरने मैदानावर जल्लोष केला.

इतर बातम्या

IPL 2021 : चेन्नई सुपरकिंग्सची कामगिरी उत्तम, पण कर्णधार धोनीच्या नावे खराब रेकॉर्ड

IPL 2021: दिल्लीचा चेन्नईवर रोमहर्षक विजय, गुणतालिकेतही मिळवलं अव्वल स्थान

हैद्राबाद संघाची फलंदाजी सर्वात रटाळ, पाहताना झोप लागते, माजी दिग्गज क्रिकेटपटूचा हल्लाबोल

(Ziva Dhoni Praying For CSK’s Win Over DC, netizens Thinks So!)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.