AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ 4 लोकांनी चुकूनही साबूदाणा खाऊ नये, होऊ शकते मोठे नुकसान

साबुदाण्यामध्ये प्रोटीन, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कार्बोहायड्रेट्स, फायबर, कॅल्शियम, आयर्न, झिंक आणि फॉस्फरस यासारखे अनेक पोषक तत्व आढळतात. पण तुम्हाला माहिती आहे का की आरोग्यासाठी फायदेशीर असलेला हा साबुदाना अनेकांना नुकसान पोहोचवू शकतो?

'या' 4 लोकांनी चुकूनही साबूदाणा खाऊ नये, होऊ शकते मोठे नुकसान
SabudanaImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 13, 2025 | 6:45 PM
Share

उपवासाच्या दिवसांमध्ये लोक फलाहार खातात. अशा वेळी साबुदाण्याचं सेवन सर्वाधिक केलं जातं. केवळ उपवासच नाही तर सामान्य दिवसांमध्येही नाश्त्यासाठी साबुदाणा खाल्ला जातो. साबुदाण्यापासून खीर, खिचडी, टिक्की आणि वड्यासारखे पदार्थ बनवले जातात. साबुदाण्यापासून बनवलेले हे पदार्थ आरोग्यदायी तसेच चवदार असतात. यामध्ये प्रोटीन, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कार्बोहायड्रेट्स, फायबर, कॅल्शियम, आयर्न, झिंक आणि फॉस्फरस यासारखे अनेक पोषक तत्व आढळतात. पण तुम्हाला माहिती आहे का की आरोग्यासाठी फायदेशीर असलेला हा साबुदाणा अनेकांना नुकसान पोहोचवू शकतो? चला जाणून घेऊया साबुदाणा खाण्याने होणारे नुकसान…

कोणत्या लोकांनी साबुदाणा खाऊ नये?

मधुमेह (डायबिटीज)

साबुदाण्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आढळतात, जे शरीरातील साखरेची पातळी वाढवतात. त्यामुळे जर तुम्ही आधीपासून मधुमेहाचे रुग्ण असाल, तर साबुदाण्याचं सेवन टाळावं.

वाचा: नवरा झोपताच नवरी सुरु झाली, कृत्य पाहून तो पाहातच बसला; मधुचंद्राच्या रात्रीचा Video Viral

लठ्ठपणा (मोटापा)

नवरात्रीच्या उपवासात जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर साबुदाण्याचं सेवन मर्यादित करावं. साबुदाण्यामध्ये कॅलरी आणि कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणात असतात, जे वजन वाढण्याचं कारण बनू शकतात.

थायरॉईड

साबुदाण्याचं जास्त सेवन केल्याने लठ्ठपणाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे थायरॉईडच्या समस्येने ग्रस्त असलेल्यांनी साबुदाण्याचं सेवन मर्यादित प्रमाणात करावं.

पचनसंस्था (डाइजेशन)

साबुदाण्याचं सेवन काही वेळा पचनाशी संबंधित समस्या निर्माण करू शकतं. यामध्ये असलेल्या झिंकमुळे पोट फुगणे, बद्धकोष्ठता, पोटदुखी, मळमळ आणि उलटी यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

बऱ्याचवेळा आपण उपवासाला साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा वडे असे वेगवेगळे प्रकार खातो. पण मुधमेह, थायरॉइटसारखे आजार असणाऱ्या लोकांनी साबुदाणा खाण्यापूर्वी १० वेळा विचार करावा. त्यांना पर्याय म्हणून बटाट्याची उपवासाची भाजी किंवा काही फळे खाता येतील.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.