रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ‘आवळा’ फायदेशीर !

आवळा आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी जेवढा फायदेशीर आहे त्यापेक्षाही अधिक आवळा रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर आहे.

रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ‘आवळा’ फायदेशीर !
आवळा

मुंबई : आवळा आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी जेवढा फायदेशीर आहे त्यापेक्षाही अधिक आवळा रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर आहे. यात व्हिटामिन बी 5, व्हिटामिन बी 6, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम समृद्ध प्रमाणात आढळते. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडेंट असतात, ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. (Amla is beneficial for boosting immunity)

रोज आवळा खाल्ल्याने आपला चेहरा नैसर्गिकरित्या चमकतो. त्यामध्ये उपस्थित अँटीऑक्सिडेंट त्वचेच्या वृद्धत्वाची समस्या कमी करतात. रस पिण्यामुळे सुरकुत्या आणि फाईन लाईन कमी होतात. हे शरीराला डिटॉक्स करण्याचे कार्य देखील करते. ज्या लोकांची हाडे कमकुवत आहेत, त्यांनी आवळा रस सेवन केला पाहिजे. हा रस आपली हाडे मजबूत करण्यासाठी कार्य करते.

आवळा हे असे सुपर फूड आहे, जे अनेक रोगांपासून बचाव करण्यासाठी वापरले जाऊ शकते. यामुळे तुमची पचनशक्ती देखील बळकट होईल. तुम्ही आवळा कच्चा, पावडर, लोणचे आणि रस या स्वरूपात खाऊ शकता, जे तुमच्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. हिवाळ्यात येणारे हे हंगामी फळ आहे, याचे सेवन करून आपण हंगामी संक्रमणापासून दूर राहू शकता.

हे लक्षात ठेवा

-गरोदरपणात आवळ्याचे सेवन केल्यास अनेक समस्या निर्माण होवू शकतात. गरोदरपणात आवळा खाणं योग्य आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे गरोदर महिलांनी आवळ्य़ाचं सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचं आहे.

-आवळ्यामुळे यकृतावर गंभीर परिणाम होऊ शकतो. आवळ्याचे जास्त सेवन केल्यास सीरम ग्लूटामिक पायरुविक ट्रान्समिनेजची मात्रा वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे पचन क्रिया मंदावते.

-सर्दी-खोकल्यासाठी देखील आवळा फायदेशीर नाही. आवळ्याच्या सेवनामुळे शरीरातील तापमान कमी होते. त्यामुळे सर्दी-खोकल्यासाठी आवळा उपयुक्त नाही.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

सावधान! अपुरी झोप स्त्रियांसाठी घातक, कर्करोगासह ‘या’ गंभीर समस्यांना ठरेल कारणीभूत…

(Amla is beneficial for boosting immunity)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI