नाश्त्याला हे पदार्थ कधीही खाऊ नका, नाहीतर तुमची तब्येत बिघडलीच म्हणून समजा
बर्याच वेळा नाश्त्यात हेल्दी फूड देखील त्रासाचे कारण बनू शकते. चला जाणून घेऊया सकाळच्या जेवणात कोणते पदार्थ खाऊ नयेत.

Healthy Breakfast : न्याहारी हा सर्वात महत्वाचा आहार मानला गेला आहे. याचे कारण असे आहे की यामुळे तुमचे शरीर दिवसभर उत्साही राहते. न्याहारी (Breakfast ) वगळू नये आणि केवळ सकस पदार्थच खावेत, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, व्यस्त जीवनशैलीमुळे लोक न्याहारीसाठी झटपट पदार्थ खाण्यास प्राधान्य देत आहेत. पण नाश्त्यातील अनेक हेल्दी फूड्स देखील त्रासाचे कारण बनू शकतात. सकाळी नाश्त्याला कोणते पदार्थ खाऊ नयेत, ते जाणून घेऊया
दही
दही हे मुख्यतः उन्हाळ्यात खाल्ले जाते. दह्यामध्ये आढळणारे प्रोबायोटिक आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे. पण आयुर्वेदानुसार सकाळी सर्वात आधी दही खाल्ल्याने शरीरात श्लेष्मा जमा होऊ शकतो.
तळलेले अन्न
सकाळी सकाळी तळलेले पदार्थही खाणे टाळावे. हे आतडे आरोग्यासाठी हानिकारक आहे. याशिवाय हे खाल्ल्याने दिवसभर पचनक्रियेत समस्या निर्माण होऊ शकतात.
कच्चे पदार्थ खाणे
न शिजवलेले किंवा कच्चे अन्न खाल्ल्याने आपल्या आरोग्याला अनेक समस्या निर्माण होतात. सकाळी सकाळी कच्चे अन्न खाल्ल्याने पचनक्रिया मंदावते.
साखरयुक्त पेय
साखरेचे पेय देखील आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात. काहीही न खाता शर्करायुक्त पेय प्यायल्याने आपल्या शरीरातील रक्तातील साखर वाढू शकते. त्यामुळेच आरोग्य तज्ज्ञही काहीही न खाता किंवा न पिता चहा-कॉफी पिण्यास मनाई करतात.
प्रोसेस्ड पदार्थ
प्रक्रिया केलेले किंवा प्रोसेस्ड अन्न कधीही निरोगी जीवनशैलीचा भाग असू शकत नाही. हे पदार्थ सर्व प्रकारच्या आजारांना आमंत्रण देतात. सकाळी प्रक्रिया केलेले अन्न खाऊ नयेच, तसेच तुम्ही ते तुमच्या रोजच्या जीवनशैलीतूनही काढून टाकले पाहिजे.
केक आणि मफिन्स
केक आणि मफिन हे मैद्यापासून बनवले जातात. सकाळच्या नाश्त्यामध्ये या गोष्टी खाण्याऐवजी आरोग्यदायी गोष्टींचा आहारात समावेश करा.
