बेकिंग सोडा त्वचेच्या अनेक समस्यांवर रामबाण उपाय !

आपल्या सर्वांच्याच स्वयंपाक घरामध्ये बेकिंग सोडा असतो. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, बेकिंग सोड्याचा उपयोग करून आपण त्वचेच्या अनेक समस्या सोडू शकतो.

बेकिंग सोडा त्वचेच्या अनेक समस्यांवर रामबाण उपाय !
सुंदर त्वचा

मुंबई : आपल्या सर्वांच्याच स्वयंपाक घरामध्ये बेकिंग सोडा असतो. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, बेकिंग सोड्याचा उपयोग करून आपण त्वचेच्या अनेक समस्या सोडू शकतो. बेकिंग सोडा (Baking Soda) त्वचेसाठी आणि शरीराच्या आरोग्यासाठीही चांगला असल्याचं समोर आलं आहे. बेकिंग सोडा त्वचेसाठी खूप फायद्याचा आहे. यामुळे त्वचेची पीएच लेव्हल संतुलित राहते. याने त्वचेमध्ये चमक आणि ताजेपणा येतो. (Baking soda is beneficial for the skin)

बेकिंग सोड्यामध्ये हळद आणि मध घाला आणि ही पेस्ट चांगली मिक्स करून घ्या आणि आपल्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा काही जोपर्यंत ही पेस्ट वाळत नाही. तोपर्यंत ही पेस्ट चेहऱ्यावर ठेवा आणि त्यानंतर थंड पाण्याने धुवा. यामुळे आपल्या चेहऱ्यावर ग्लो येईल.
बेकिंग सोडा हा एक एक्सफॉलिएटर म्हणून काम करतं. हे तुमच्या चेहऱ्यावरील पोर्समध्ये असलेली घाण बाहेर काढण्यास मदत करते.

मधामुळे तुमची त्वचा मॉईश्चरायईज होते आणि स्किन ग्लो करते. हळदीमध्ये असेलल्या अँटीऑक्सिडेंट गुणांमुळे तुमची त्वचा उजळते. बेकिंग सोडा सुर्याच्या उष्णतेला रोखतो आणि त्वचेला आराम देतो. यामुळे खास येणार नाही. अँटी सेप्टिक गुणधर्मा सूर्यप्रकाशामुळे होणारा अल्सर बरा करतो. यासाठी बेकिंग सोडा आणि थंड पाण्याची पेस्ट बनवून लावा आणि मग धुवा. तुम्ही बेकिंग सोडा आंघोळीच्या पाण्यात मिसळूनही अंघोळ करू शकता.

तुम्ही चेहऱ्यावरील आठवड्याची घाण काढण्यासाठी लिंबावर बेकिंग सोडा लावू चेहऱ्यावर रब करू शकता. लिंबावर मध लावूनही तुम्ही चेहऱ्यावर मसाज करू शकता. चेहऱ्यावर पुरळ, खाज सुटणं आणि सूज येणं थांबेल. बेकिंग सोडामध्ये नारळ तेल मिसळा आणि ही पेस्ट 5-5 मिनिटांसाठी लावा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Food | ‘या’ पदार्थांना दूर ठेवा आणि हिवाळ्याच्या काळात सर्दी-खोकल्यापासून सुरक्षित राहा!

(Baking soda is beneficial for the skin)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI