बनाना शेक प्यायल्यावर वजन वाढतं?, जाणून घ्या काय फायदे? काय तोटे?…

जर तुमचे वजन कमी आहे आणि तुम्ही वजन वाढवण्यासाठी प्रयत्न करत असाल तर लोक वजन वाढवण्यासाठी केळीचा शेक पिण्याचा सल्ला देतात.

बनाना शेक प्यायल्यावर वजन वाढतं?, जाणून घ्या काय फायदे? काय तोटे?...

मुंबई : जर तुमचे वजन कमी आहे आणि तुम्ही वजन वाढवण्यासाठी प्रयत्न करत असाल तर लोक वजन वाढवण्यासाठी केळीचा शेक पिण्याचा सल्ला देतात. केळीमध्ये फायबर आणि कॅलरीचे प्रमाण जास्त असते, म्हणून जर एखाद्याला वजन वाढवायचे असेल तर केळी शेक पिणे चांगले मानले जाते. परंतू केळी वर्कआऊट नंतर खाण्याचा सल्ला देखील दिला जातो. यामुळे बहुतेक लोक संभ्रमात पडतात की केळी खाल्ल्यास खरंच वजन वाढतं की नाही. (banana shake makes you gain weight know the fact)

केळी हे सर्वात पौष्टिक फळांपैकी एक आहे जे आपण आपल्या आहारात समाविष्ट करू शकतो. केळीमध्ये चरबीचे प्रमाण खूप कमी असते आणि भरपूर प्रमाणात पोटॅशियम आणि फायबर असते. यामुळेच वर्कआऊट नंतर केळी खाण्याच सल्ला दिला जातो. आपल्याला यामुळे बराच काळ भूक देखील लागत नाही. केळीमध्ये अँटीऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन सी असतात. हे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

फक्त केळी खाल्ल्याने तुमचे वजन वाढत नाही किंवा कमी होत नाही. वजन वाढविण्यासाठी आपल्याला पुरेसा आहार आणि व्यायाम घ्यावा करावा लागतो. वजन वाढविण्यासाठी आहार आणि व्यायाम या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. केळीच्या शेकमुळे वजन वाढवणे शक्य आहे असे बोलले जाते मात्र, कुढल्या अभ्यासामध्ये हे सिध्द झालेले नाहीये.

केळीमध्येही पोटॅशियम आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. परंतु केळी देखील आम्ल आहे. तज्ञांच्या मते, रिकाम्या पोटी अम्लीय पदार्थ घेतल्याने पाचन समस्या उद्भवू शकते. केळीमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते. अशा परिस्थितीत रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने रक्तातील दोन्ही पोषक द्रव्यांचे प्रमाण वाढते, जे तुमच्या हृदयालाही नुकसान करते.

संबंधित बातम्या : 

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(banana shake makes you gain weight know the fact)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI