बदामाचा ‘हा’ फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि चेहऱ्याच्या सर्व समस्या दूर करा

सुंदर त्वचा मिळवण्यासाठी आपण विविध प्रयत्न करत असतो. सुंदर आणि चमकदार त्वचा मिळण्यासाठी महिला पार्लरमध्ये जाऊन विविध उपचार घेतात. त्याचा परिणाम काही दिवसांपर्यंत दिसून येतो.

बदामाचा 'हा' फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि चेहऱ्याच्या सर्व समस्या दूर करा
बदामाचा फेसपॅक

मुंबई : सुंदर त्वचा मिळवण्यासाठी आपण विविध प्रयत्न करत असतो. सुंदर आणि चमकदार त्वचा मिळण्यासाठी महिला पार्लरमध्ये जाऊन विविध उपचार घेतात. त्याचा परिणाम काही दिवसांपर्यंत दिसून येतो. मात्र, त्यानंतर त्वचा निर्जीव आणि काळपट दिसू लागते. यामुळे त्वचा अधिकच खराब होत जाते. मात्र, सुंदर आणि तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी पार्लरमध्येच जावे असे काही नाही. आपण घरगुती उपाय करून देखील आपली त्वचा सुंदर आणि मुलायम करू शकतो. (Almond face pack is extremely beneficial for the skin)

आज आम्ही सुंदर त्वचा मिळण्यासाठी आणि त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी एक खास फेसपॅक सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची त्वचा सुंदर होईल. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, बदाम आपल्या त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर असतात. आपण जर बदामाचा फेसपॅक आपल्या चेहऱ्याला लावला तर आपली त्वचा अधिक सुंदर होण्यास मदत होते. यासाठी सहा ते सात बदाम, गुलाब पाणी, मध आणि चंदन पावडर घ्या. हे सर्व साहित्य बारीक करून घ्या आणि त्याची चांगली पेस्ट तयार करा.

ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि त्यानंतर साधारण वीस मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. हा फेसपॅक आपण आठ दिवसातून एकदा तरी लावला पाहिजे. बदामांमध्ये व्हिटामिन ई भरपूर प्रमाणात असते. बदाम तेल चेहऱ्यावरील काळे डाग दूर करून, रंग उजळण्यास मदत करते. दररोज रात्री बदामाच्या तेलाने चेहऱ्यावर मसाज करा. हळूहळू, आपला रंग देखील उजळेल आणि त्वचा चमकू लागेल.

चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी बदामाच्या तेल फायदेशीर आहे. या तेलाची मालिश केल्यास चेहऱ्याचं सौंदर्य अधिक खुलायला लागतं. ब्लॅकहेड्सची समस्याही दूर होण्यास मदत मिळते. चेहऱ्यावरील वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यासाठी बदामाचे तेल, बदाम पेस्ट किंवा बदामाचे दुधाचा वापर आपण करू शकता. यासाठी काही बदाम रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर भिजलेले बदाम मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून पेस्ट तयार करा आणि संपूर्ण चेहऱ्यावर लावा.

संबंधित बातम्या : 

Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता

Milk Benefits | दररोज एक ग्लास गरम दूध सेवन करा, ‘या’ आजारांना दूर पळावा!

(Almond face pack is extremely beneficial for the skin)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI