Skin Care : कोरफड आणि हळदीचा फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक !

कोरफड आपल्या आरोग्यासाठी, केसांसाठी आणि त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढविणे, पोटाच्या समस्या आणि त्वचेच्या समस्या कमी करण्यात कोरफडीचा खूप फायदा होतो.

Skin Care : कोरफड आणि हळदीचा फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक !
फेसपॅक

मुंबई : कोरफड आपल्या आरोग्यासाठी, केसांसाठी आणि त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे, पोटाच्या समस्या आणि त्वचेच्या समस्या कमी करण्यात कोरफडीचा खूप फायदा होतो. यामुळे बरेच लोक रस, भाजी किंवा इतर आणखी प्रकारे कोरफडचे सेवन करतात. मात्र, आपण जर कोरफडचा फेसपॅक आपल्या चेहऱ्याला लावला तर चेहऱ्याच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. (Aloe vera and turmeric face pack are beneficial for the skin)

कोरफडचा फेसपॅक घरच्या घरी तयार करण्यासाठी आपल्याला चार चमचे कोरफडचा गर लागणार आहे. त्यामध्ये हळद मिक्स करून चांगली पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट साधारण 25 मिनिटांसाठी आपल्या चेहऱ्यावर लावा. त्यानंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा. यामुळे चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. मात्र, कोरफडचा हा फेसपॅक तयार करण्यासाठी कोरफड नेहमीच ताजी असली पाहिजे. हा फेसपॅक आपण आठ दिवसातून चार वेळा त्वचेला लावला पाहिजे.

कोरफड आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. कोरफडमध्ये ए, बी1, बी2, बी3, बी6, बी12, सी, ई आणि फॉलिक अॅसिड यांसारखी पोषक तत्व आढळतात. फोरफडचा फेसपॅक तयार करण्यासाठी आपल्याला दोन चमचे ताजी कोरफड, हळद, मध आणि एक चमचा लिंबाचा रस लागणार आहे. सर्वात अगोदर कोरफडमध्ये हळद, मध आणि लिंबाचा रस मिक्स करा आणि पेस्ट तयार करा, त्यानंतर पेस्ट काही वेळ फ्रीसमध्ये ठेवा आणि चेहऱ्याला लावा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.

कोरफड जेलमध्ये थोडीशी साखर आणि लिंबाचा रस मिसळून त्याचा स्क्रब तयार करू शकता. हा स्क्रब त्वचेवरील डेड स्कीन तर काढतोच आणि त्वचेलाही हायड्रेट ही करतो. यामुळे तुमची त्वचा मऊ, मुलायम आणि स्वच्छ होते. याशिवाय कोरफडाच्या रसात थोडेसे नारळाच्या तेलाचे थेंब घालून ते गुडघे, टाचा आणि हाताच्या कोपराला लावल्यास काळेपणा दूर होतो. कोरफडीचा गर वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. कोरफडमध्ये व्हिटामिन आणि फायबर गुणधर्म असतात.

(टीप : कोणतेही व्यायामप्रकार करताना तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Makeup Tips | वयाच्या चाळीशीतही सुंदर दिसायचंय? तर मेकअप करताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात!

Fitness | वयाच्या 60व्या वर्षीही राहाल तंदुरुस्त, जाणून घ्या ‘या’ योगासनांबद्दल…

(Aloe vera and turmeric face pack are beneficial for the skin)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI