केस गळती थांबवण्यासाठी अंडी, दही आणि लिंबाचा हेअर मास्क फायदेशीर, वाचा!

अनेक महिला केस गळतीच्या समस्येमुळे त्रस्त असतात. सुरुवातीला केस गळायला लागल्यावर आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र त्यानंतर केस गळतीची समस्या वाढते आणि हळूहळू टक्कल पडायला लागते.

केस गळती थांबवण्यासाठी अंडी, दही आणि लिंबाचा हेअर मास्क फायदेशीर, वाचा!
केस गळती

मुंबई : अनेक महिला केस गळतीच्या समस्येमुळे त्रस्त असतात. सुरुवातीला केस गळायला लागल्यावर आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र त्यानंतर केस गळतीची समस्या वाढते आणि हळूहळू टक्कल पडायला लागते. काही ठराविक वयानंतर केस गळणे ही सामान्य बाब आहे. पण आपल्या नियमित सवयींमुळे केस गळतीचे प्रमाणात वाढते. या सवयींमध्ये बदल केल्यास केस गळण्याचे प्रमाण कमी होऊ शकतो. (Eggs, curd and lemon hair mask are beneficial to stop hair loss)

आज आम्ही तुम्हाला केस गळती थांबवण्यासाठी एक खास हेअर मास्क सांगणार आहोत. हा हेअर मास्क घरी तयार करण्यासाठी आपल्याला अंडी, दही आणि लिंबू लागणार आहे. यासाठी दोन अंडी, एक वाटी दही आणि चार चमचे लिंबाचा रस लागणार आहे. हा हेअर मास्क तयार करण्यासाठी सर्वात अगोदर वरील तिन्ही गोष्टी एकत्र मिक्स करून घ्या आणि एक जीव करा, हा हेअर मास्क तीस मिनिटांसाठी आपल्या केसांना लावा. त्यानंतर केस कोमट पाण्याने धुवा.

हा हेअर मास्क आपण आठ दिवसातून चार वेळा लागला पाहिजे. यामुळे आपली केस गळतीची समस्या दूर होण्यास मदत होईल. हिबिस्कस अर्थात जास्वंदाची आठ फुले व आठ पाने घ्या आणि त्यांना चांगले धुवून, त्याची बारीक पेस्ट बनवा. आता एका सॉसपॅन/तव्यामध्ये एक कप नारळ तेल गरम करा आणि त्यात ही पेस्ट घाला आणि एकदा ढवळा. नंतर गॅस बंद करा आणि सॉसपॅनला थोड्यावेळासाठी झाकून ठेवा. थंड झाल्यावर, ते एका कंटेनरमध्ये भरा आणि आठवड्यातून किमान तीन दिवस केसांवर लावा. यामुळे केस गळती कमी होते.

आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी कोरफड खूप उपयुक्त आहे. कोरफड, नारळ तेल आणि कांद्याचा रस यांचे तेल घरी तयार करून केसांना लावले तर केस गळतीची समस्या दूर होऊ शकते. तेल तयार करण्यासाठी सर्वात अगोदर कांदा बारीक किसून अथवा कांदा ज्यूसरमधून काढला तरी चालतो मात्र, कांद्याचा रस हा ताजा असावा. त्यानंतर कोरफड द्या कोरफडीचा बाजूचा सर्व भाग काढून टाका त्यानंतर कांद्याचा रस कोरफड आणि नारळाचे तेल एकत्र करा रोज हे तेल केसांना लावा यामुळे तुमचे केस सुंदर, जाड, लांब आणि मजबूत दिसतील.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Eggs, curd and lemon hair mask are beneficial to stop hair loss)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI