Skin Care : आवळा, लिंबू आणि मधाचा फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर!

आपण त्वचेला चमकदार आणि निरोगी ठेवण्यासाठी बर्‍याचदा वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करतो. कधीकधी कॉस्मेटिक उत्पादने किंवा घरगुती उपचारही करून पाहतो. काही लोक यासाठी ब्युटी पार्लरचा आधार घेतात.

Skin Care : आवळा, लिंबू आणि मधाचा फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर!
फेसपॅक
Follow us
| Updated on: Jul 31, 2021 | 7:33 AM

मुंबई : आपण त्वचेला चमकदार आणि निरोगी ठेवण्यासाठी बर्‍याचदा वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करतो. कधीकधी कॉस्मेटिक उत्पादने किंवा घरगुती उपचारही करून पाहतो. काही लोक यासाठी ब्युटी पार्लरचा आधार घेतात. परंतु, कोरोनामुळे महिला पार्लरमध्ये जाण्यासाठी देखील टाळतात. याकाळात बरेच लोक घरगुती उपचार करून पाहत आहेत. (Face pack of amla, lemon and honey is beneficial for the skin)

आपण देखील त्वचेच्या उपचारांसाठी काही घरगुती उपायांचा अवलंब करण्याचा विचार करत आहात. आपण आवळा, लिंबू आणि मधाचा फेसपॅक त्वचेला लावला पाहिजे. आवळा, लिंबू आणि मधाचा फेसपॅक आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. या फेसपॅकमुळे चेह-यावरील पुटकुळ्या कमी होतात.

हा फेसपॅक तयार करण्यासाठी 2 चमचे आवळ्याचा रस, 2 चमचा लिंबाचा रस, 1 चमचा मध आणि त्यात आणखी 2 चमचे आवळा पावडर एकत्र करुन हा फेसपॅक चेह-यावर लावा त्यानंतर 20 मिनीटांनी चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे चेहऱ्यावरील पुटकुळ्या जाण्यास मदत होते. हा फेसपॅक आपण कधीही चेहऱ्याला लावू शकतो.

केळी आणि गुलाब पाण्याचा फेसपॅक आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. हा फेसपॅक वापरल्याने त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. विशेष म्हणजे हा पॅक घरी तयार करण्यासाठी आपल्याला जास्त वेळही लागत नाही. हा पॅक तयार करण्यासाठी एक केळी आणि पाच चमचे गुलाब पाणी घ्या. त्यानंतर याची चांगली पेस्ट तयार करा आणि संपूर्ण चेहऱ्यावर लावा.

ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर वीस मिनिटे ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने आपला चेहऱा धुवा. केळीचा फेसपॅक आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. केळीचा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी एक केळी, एक चमचा दही, एक चमचा मध, लिंबाचा रस एक चमचा, मुलतानी माती एक चमचा, अर्धा चमचा हळद मिक्स करा आणि याची चांगली पेस्ट तयार करा आणि चेहऱ्याला लावा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Face pack of amla, lemon and honey is beneficial for the skin)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.