Skin Care : मध, हळद आणि नारळ पाण्याचा फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा! 

निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी आपण विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर करतो. मध, हळद, नारळ पाण्याचा फेसपॅक आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे आपल्या त्वचेचा टोन सुधारण्यास मदत होते.

Skin Care : मध, हळद आणि नारळ पाण्याचा फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा! 
सुंदर त्वचा
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 7:05 AM

मुंबई : निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी आपण विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर करतो. परंतु, आपणास माहित आहे का की, या महागड्या उत्पादनांऐवजी काही चांगल्या सवयींचा अवलंब करून देखील आपण निरोगी त्वचा मिळवू शकता. या सवयींचा अवलंब केल्याने त्वचा सुधारण्यास सुरुवात होते. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी नेहमी आपण घरगुती फेसपॅकचा वापर केला पाहिजे. (Face pack of honey, turmeric and coconut water is beneficial for the skin)

मध, हळद, नारळ पाण्याचा फेसपॅक आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे आपल्या त्वचेचा टोन सुधारण्यास मदत होते. हा फेसपॅक तयार करण्यासाठी आपण एक चिमुठभर हळद, दोन चमचे मध आणि चार चमचे नारळ पाणी घ्या. वरील हे सर्व साहित्य एकत्र मिक्स करा आणि संपूर्ण चेहऱ्याला लावा. साधारण वीस मिनिटे हा फेसपॅक आपल्या चेहऱ्यावर राहूद्या आणि त्यानंतर आपला चेहरा थंड पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्याचा अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

हा फेसपॅक आपण आठ दिवसातून तिनदा लावला पाहिजे. अर्धी केळी आणि तीन चमचे कोरफड लागणार आहे. सर्वात अगोदर केळी बारीक करून घ्या आणि त्यामध्ये कोरफड मिक्स करून घ्या. यानंतर ही तयार झालेली पेस्ट चेहऱ्यासह मानेवर लावा. तीस मिनिटे ही पेस्ट चेहऱ्यावर तशीच ठेवा आणि थंड पाण्याने चेहरा धुवा, हा खास फेसपॅक आपण आठवड्यातून तीन ते चार वेळा चेहऱ्यावर लावू शकता. यामुळे आपली त्वचा तजेलदार होण्यास मदत होईल.

बटाट्याचा फेसपॅक तयार करण्यासाठी एक बटाटा आणि चार चमचे मध घ्या. सर्वात अगोदर बटाटा किसून घ्या आणि त्यामध्ये मध मिक्स करा. त्यानंतर ही पेस्ट मिक्स करून बारीक करून घ्या. हा फेसपॅक एक तासांसाठी आपल्या चेहऱ्यावर लावा. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. हा फेसपॅक आपण आठ दिवसातून तीन ते चार वेळा लावला पाहिजे. यामुळे चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

(Face pack of honey, turmeric and coconut water is beneficial for the skin)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.