Skin Care : हिवाळ्याच्या हंगामात ओट्स आणि कॉफीचा फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर!

हिवाळ्याच्या हंगामात फक्त आरोग्याची काळजी घेऊन चालत नाहीतर केस आणि त्वचेची देखील काळजी घ्यावी लागती. या हंगामात केस आणि त्वचा कोरडी पडते. ते टाळण्यासाठी आपण काही घरगुती उपाय केले पाहिजे.

Skin Care : हिवाळ्याच्या हंगामात ओट्स आणि कॉफीचा फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर!
त्वचेची काळजी

मुंबई : हिवाळ्याच्या हंगामात फक्त आरोग्याची काळजी घेऊन चालत नाहीतर केस आणि त्वचेची देखील काळजी घ्यावी लागती. या हंगामात केस आणि त्वचा कोरडी पडते. ते टाळण्यासाठी आपण काही घरगुती उपाय केले पाहिजे. कारण हिवाळ्याच्या हंगामात एकदा आपली त्वचा खराब झाली की, परत त्वचेवरील तेज मिळवणे कठीण होऊन जाते. हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी ओट्स आणि कॉफी फायदेशीर आहे.

हिवाळ्यात त्वचेवरील कोरडेपणा काढण्यासाठी ओट्स आणि कॉफी फायदेशीर आहे. यासाठी आपल्याला दोन चमचे ओट्स आणि एक चमचा काॅफी लागणार आहे. त्यानंतर ओट्स आणि कॉफीमध्ये चार चमचे खोबरेल तेल मिक्स करा आणि याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर राहूद्या. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. या खास फेसपॅकमुळे चेहऱ्यावरील कोरडी त्वचा दूर होण्यास मदत मिळेल.

जर तुमच्या चेहऱ्यावरील त्वचा कोरडी पडत असल्यास ताज्या दुधावरची मलई चेहऱ्यावर लावावी. त्यानंतर हलक्या हातांनी चेहऱ्याला मालिश करा. मुलतानी माती पाण्यात भिजवून काही वेळ ठेवा. त्याचे मिश्रण चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचा देखील तजेलदार होते. चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी बदामाच्या तेलाचा फायदा होतो. या तेलाची मालिश केल्यास चेहरा सुंदर होण्यास मदत होते.

केळ्याच्या मिश्रणात एक चमचा खोबरेल तेल मिसळून चेहऱ्यावर लावा. कोरडे झाल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. जर तुमची त्वचा कोरडी असेल, तर तुम्ही अशा गोष्टी वापरल्या पाहिजेत. ज्यामुळे तुमचा चेहरा मॉइश्चराइझ होऊ शकेल. मात्र, केळीचा फेसपॅक चेहऱ्याला लावताना हे नेहमीच लक्षात ठेवा की, केळी ताजी असावी आणि एकदा तयार केलेला फेसपॅक परत लावू नका.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Food | थंडीच्या दिवसांत आहारात ‘या’ गोष्टी समविष्ट करा आणि आजारांपासून दूर राहा!

Health | मधुमेहाची चिंता सतावतेय? या 5 पदार्थांचा आहारात समावेश करा आणि टेन्शन मुक्त व्हा!

Published On - 12:17 pm, Thu, 2 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI