AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Winter Skincare: हिवाळ्याच्या हंगामात चमकदार त्वचा मिळविण्यासाठी ‘या’ 5 टिप्स फाॅलो करा! 

जसाजसा हिवाळा ऋतू जवळ येतो, तेंव्हा कोरड्या त्वचेची समस्या जाणू लागते.  कडाक्याच्या थंडीमुळे त्वचेला खाज सुटते आणि त्वचा कोरडी होते. जसे तापमान कमी होते, तसतसे आपली त्वचा चमक, कोमलता गमावते आणि खडबडीत होते.

Winter Skincare: हिवाळ्याच्या हंगामात चमकदार त्वचा मिळविण्यासाठी 'या' 5 टिप्स फाॅलो करा! 
त्वचेची काळजी
| Edited By: | Updated on: Nov 22, 2021 | 10:28 AM
Share

मुंबई : जसाजसा हिवाळा ऋतू जवळ येतो, तेंव्हा कोरड्या त्वचेची समस्या जाणू लागते.  कडाक्याच्या थंडीमुळे त्वचेला खाज सुटते आणि त्वचा कोरडी होते. जसे तापमान कमी होते, तसतसे आपली त्वचा चमक, कोमलता गमावते आणि खडबडीत होते. त्वचा कोरडी पडू नये यासाठी आपण उपाय करतो. मात्र, तरीही त्वचेचा कोरडेपणा काही कमी होत नाही.

1. त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी आपण अॅपल सायडर व्हिनेगर, शिया बटर, कॅमोमाइल, आर्गन तेल इत्यादी नैसर्गिक घटक वापरू शकता. उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात एकच स्किनकेअर वापरणे नेहमीच योग्य नसते. कारण काही गोष्टी उन्हाळ्यात तुमची त्वचा चांगली बनवू शकतात, परंतु हिवाळ्यात नाही.

2. हिवाळ्यात हीटरसमोर बसण्याचा मोह होतो. मात्र, आपल्या त्वचेतील ओलावा कमी होतो आणि त्वचा आणखी कोरडी होते.

3. गरम पाण्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करा. कारण खूप गरम पाण्याने आंघोळ केल्याने तुमची त्वचा लवकर कोरडी होऊ शकते आणि जर तुम्ही ते लगेच मॉइश्चरायझ केले नाही तर हिवाळ्यात तुमच्या त्वचेला तडे जाऊ शकतात.

4. त्वचेतून मृत पेशी काढून टाकणे याला एक्सफोलिएटिंग म्हणतात. परंतु आपण ते सावधगिरीने वापरले पाहिजे कारण हिवाळ्यात त्वचा आधीच खराब होते.

5. आठवड्यातून एकदा आपली त्वचा एक्सफोलिएट करणे पुरेसे आहे. हे त्वचेचे पुनरुत्पादन आणि उत्पादन शोषण्यास मदत करते. जर तुमची त्वचा खूप कोरडी असेल तर तुमची त्वचा हलकेच एक्सफोलिएट करा.

आहाराची काळजी घ्या.

हिवाळ्यात बरीच हंगामी फळे आणि भाज्या बाजारात दिसू लागतात. फळे आणि हिरव्या भाज्या खाणे नेहमीच फायदेशीर ठरते. परंतु या हंगामात, विशेषत: बेरीज् (स्ट्रॉबेरी, कॅनबेरी, ब्लॅकबेरी, ब्लूबेरी) खाणे फायद्याचे ठरते. बेरीमध्ये जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडेंट्स असतात, ज्यामुळे आपली त्वचा निरोगी आणि चमकदार राहण्यास मदत होते. हिवाळ्यात आहारात सूप, कोशिंबीर, रस आणि दूध यांचा समावेश करावा. यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होईल.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Face Massage | त्वचेसाठी संजीवनी ठरेल ‘फेस मसाज’, वाचा याचे फायदे…

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.