AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin care Tips : या सवयींमध्ये बदल करा नाहीतर कमी वयातच वृद्धत्वाची लक्षणे दिसतील!

आजच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आपण त्वचेची काळजी घेऊ शकत नाही, ज्यामुळे वृद्धत्वाची चिन्हे दिसतात. आपण वयाआधीच वृद्ध दिसू लागतो.

Skin care Tips : या सवयींमध्ये बदल करा नाहीतर कमी वयातच वृद्धत्वाची लक्षणे दिसतील!
चेहऱ्यावरील सुरकुत्या
| Edited By: | Updated on: Jul 08, 2021 | 11:04 AM
Share

मुंबई : आजच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आपण त्वचेची काळजी घेऊ शकत नाही, ज्यामुळे वृद्धत्वाची चिन्हे दिसतात. आपण वयाआधीच वृद्ध दिसू लागतो. त्वचेवर सुरकुत्या आणि बारीक रेषा दिसू लागतात. वृद्ध होणे ही एक प्रक्रिया आहे जी आपण थांबवू शकत नाही, परंतु काळापूर्वी वृद्धत्वाची चिन्हे चेहऱ्यावर दिसणे ही त्रासदायक बाब आहे. वृद्धत्वाच्या चिन्हे दूर करण्यासाठी आपण काही बदल केले पाहिजे. (Follow these tips to avoid the signs of aging)

बराच वेळ स्क्रीन पाहणे

आपल्यापैकी बरेच जण आपला वेळ ऑनलाइन घालवतात. सतत मोबाईल, लॅपटाॅप आणि टॅबवर राहिल्याने आपल्या त्वचेवर याचा वाईट परिणाम होतो. यामुळे त्वचा लूज पडण्यास सुरूवात होते. तसेच यामुळे डोळ्यांखाली डाके सर्कल देखील होतात.

पुरेसे पाणी न पिल्यामुळे

आपले शरीर 60 टक्के पाण्याने बनलेले आहे आणि निरोगी जीवनशैली टिकवण्यासाठी ते खूप महत्वाचे आहे. पुरेसे पाणी न पिल्याने थकवा, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या उद्भवू शकतात. डिहायड्रेशनमुळे बारीक रेषा आणि गडद वर्तुळांची समस्या वाढते. त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी पुरेसे पाणी प्या. यामुळे त्वचा तरूण आणि चमकदार दिसेल.

 जास्त साखर खाणे टाळा

त्वचेत कोलेजेन आणि इलेस्टिन या दोन मुख्य गोष्टी आहेत. ज्यामुळे त्वचा तंदुरुस्त राहण्यास मदत होते. एका अभ्यासानुसार, जास्त प्रमाणात साखर किंवा ग्लुकोजचे सेवन केल्याने कोलेजन आणि इलेस्टिन कमकुवत होते, ज्यामुळे त्वचेवर वृद्धत्वाची चिन्हे तयार होतात. यामुळे जास्त गोड पदार्थ खाणे टाळाच.

ताण आणि झोपेचा अभाव

आजच्या काळात बहुतेक लोक पुरेशी झोप घेत नाहीत. तसेच कामाच्या ताणामुळे सतत तणावाखाली राहतात. पुरेशी झोप न घेतल्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर दिसून येतो. याशिवाय जास्त ताणामुळे, कॉर्टिसॉल हार्मोन सोडला जातो, ज्यामुळे आपली त्वचा अधिक तेलकट होते. यामुळे त्वचेवर मुरुम आणि बारीक पुरळ येतात.

सुरकुत्या

वयाआधी चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या देखील वृद्धत्वाच्या समस्येचे चिन्ह आहे. काही लोक अनुवांशिकरित्या त्यास बळी पडू शकतात. या व्यतिरिक्त तंबाखूचे सेवन, सूर्यप्रकाशाचा अभाव, आहारविषयक सवयी आणि जास्त मद्यपान, हे देखील याला जबाबदार असू शकते.

संबंधित बातम्या : 

Oily Skin | उन्हाळ्यात चेहरा तेलकट होतोय? ‘या’ गोष्टींचा वापर केल्यास सर्व समस्या होतील दूर!

Skin Care | त्वचेचेही असतात वेगवेगळे प्रकार, जाणून घ्या कोणता घरगुती स्क्रब ठरेल अधिक फायदेशीर!

(Follow these tips to avoid the signs of aging)

महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.