AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात तुमच्याही चेहऱ्यावर दिसतात ब्लॅकहेड्स , तर ‘या’ टिप्स करा फॉलो

चेहऱ्यावर दिसणारे छोटे काळे पुरळ ब्लॅकहेड्स म्हणून ओळखले जातात. उन्हाळ्यात ही समस्या थोडी जास्त वाढते. त्यामुळे यातून सुटका मिळवण्यासाठी या टिप्सचा अवलंब करा.

उन्हाळ्यात तुमच्याही चेहऱ्यावर दिसतात ब्लॅकहेड्स , तर 'या' टिप्स करा फॉलो
Blackheads Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 02, 2025 | 2:23 PM
Share

उन्हाळा सुरू झाला की आपल्याला जास्त घाम आणि तेलकटपणामुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात. यामध्ये चेहऱ्यावर लहान मुरुमे दिसू लागतात. त्वचेच्या छिद्रांमध्ये तेल म्हणजेच सेबम, मृत त्वचेच्या पेशी आणि घाण जमा होऊ लागते. जेव्हा हे छिद्र उघडतात आणि हवेच्या संपर्कात येतात तेव्हा ते ऑक्सिडायझेशन होतात आणि काळे दिसू लागतात, ज्याला ब्लॅकहेड्स म्हणतात.

उन्हाळ्यात ही समस्या थोडी जास्त वाढते कारण यावेळी तेलासह चेहऱ्यावर घाम देखील जास्त दिसून येतो. अशा वेळेस त्वचेची योग्य काळजी घेण्यासोबतच, काही घरगुती उपाय केल्यास या समस्यापासुन सुटका मिळू शकते. चला तर मग आजच्या या लेखात आपण घरगुती उपाय करून ब्लॅकहेड्सची समस्येपासून सुटका कशी मिळवता येईल हे जाणून घेऊयात…

फेस वॉश

चेहऱ्यावरील जास्त धूळ आणि सेबममुळे ब्लॅकहेड्स होतात. म्हणून सकाळी आणि रात्री असे दिवसातून दोनदा चेहरा धुवा. तसेच बाहेरून कुठूनही आलात तर चेहरा धुणे खूप महत्वाचे आहे. कारण ते त्वचेवर साचलेली घाण काढून टाकण्यास मदत करते, ज्यामुळे चेहरा स्वच्छ होतो. रात्री त्वचेला दुरुस्तीची संधी मिळते. म्हणून, फेस वॉश केल्यानंतर, त्वचेच्या प्रकारानुसार मॉइश्चरायझर लावा.

एक्सफोलिएट करा

उन्हाळ्यात तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार आठवड्यातून दोनदा चेहरा स्क्रब करा. यामुळे चेहऱ्यावर साचलेली घाण साफ होण्यास मदत होते. यानंतर फेस पॅक लावा कारण ते उघडे छिद्र बंद करण्यास मदत करते. त्वचेला हायड्रेटेड आणि चमकदार बनवण्यासाठी देखील हे फायदेशीर आहे.

ग्रीन टी

ग्रीन टी जशी आरोग्यासाठी फायदेशीर आहे तसेच त्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स देखील त्वचेसाठी फायदेशीर आहेत. यासाठी गरम पाण्यात ग्रीन टी बॅग ठेऊन त्याचा चहा बनवा. त्यानंतर थंड होऊ द्या. कापसाच्या मदतीने ब्लॅकहेड्सवर ग्रीन टी लावा आणि 15 मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर चेहरा धुवा.

हळदीचा वापर

हळद ब्लॅकहेड्स कमी करण्यास मदत करू शकते. तुम्ही हळदीचा फेसपॅक बनवून चेहऱ्यावर लावू शकता. हळदीमध्ये नारळ तेल किंवा मध मिसळून फेस पॅक बनवता येतो. प्रथम हळद हलकी भाजून घ्या, नंतर त्यात मध घाला आणि फेस पॅक बनवा. ते चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटे लावा आणि नंतर पाण्याने चेहरा धुवा.

मुलतानी माती

मुलतानी माती ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स कमी करण्यास मदत करू शकते. यासाठी मुलतानी माती रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी त्यात पाणी आणि गुलाबजल मिक्स करून पेस्ट बनवा. आता तयार पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि सुकल्यानंतर चेहरा पाण्याने धुवा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री.
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का.
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?.
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?.
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.