AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Homemade Face Pack : ग्लोईंग त्वचेसाठी मैद्याचे ‘हे’ फेसपॅक फायदेशीर!

मैदा हा स्वयंपाक घरामध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो. केक, समोसे आणि कचोरी यासारखे अनेक पदार्थ तयार करण्यासाठी मैदाचा वापर केला जातो.

Homemade Face Pack : ग्लोईंग त्वचेसाठी मैद्याचे 'हे' फेसपॅक फायदेशीर!
फेसपॅक
| Edited By: | Updated on: Jul 16, 2021 | 2:22 PM
Share

मुंबई : मैदा हा स्वयंपाक घरामध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो. केक, समोसे आणि कचोरी यासारखे अनेक पदार्थ तयार करण्यासाठी मैदाचा वापर केला जातो. विशेष म्हणजे आपण सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी देखील मैद्याचे विविध फेसपॅक घरच्या-घरी तयार करू शकतो. ज्यामुळे आपली त्वचा चमकदार दिसण्यास मदत होते. या व्यतिरिक्त मैदा अनेक जीवनसत्त्वानी समृद्ध आहे. (Maida’s face pack is beneficial for the skin)

मैदा आणि दही फेसपॅक – दही त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. यात लॅक्टिक अॅसिड आहे. जे त्वचेचे टॅनिंग काढून टाकते. तसेच दह्यामध्ये जस्त आणि बर्‍याच प्रकारचे खनिजे असतात, जे त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. आपल्या चेहऱ्यावर डाग किंवा मुरुम असेल तर आपण दह्यामध्ये मैदा मिक्स करून चेहऱ्याला लावला पाहिजे. ज्यामुळे मुरूम आणि डागांची समस्या दूर होण्यास मदत होईल.

लिंबू आणि मैदा – लिंबामध्ये ब्लीचिंग गुणधर्म असतात. यासह, त्वचेचे टॅनिंग काढले जाऊ शकते. लिंबाचा रस थेट त्वचेवर लावणे हानिकारक आहे. यामुळे त्वचेवर पुरळ किंवा खाज सुटू शकते. म्हणून आपण ते मैद्यामध्ये मिसळावे आणि त्याची चांगली पेस्ट तयार करून चेहऱ्याला लावा. 2 चमचे लिंबाचा रस, 1 चमचे मैदा आणि 1 चमचे ऑलिव्ह तेल आवश्यक असेल. या तिन्ही घटकांना मिसळून गुळगुळीत पेस्ट बनवा. यामुळे टॅन कमी होण्यास मदत होईल.

मैदा आणि कोरफड – त्वचा तजेलदार आणि मुलायम करण्यासाठी आपण मैदा आणि कोरफडचा फेसपॅक आपल्या चेहऱ्याला लावला पाहिजे. हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी तीन चमचे मैदा आणि चार चमचे कोरफडचा गर घ्या. हे व्यवस्थित मिक्स करून याची चांगली पेस्ट तयार करा. त्यानंतर ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट चेहऱ्यावर ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Maida’s face pack is beneficial for the skin)

Follow Us
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं?