Skin Care Tips : चमकदार त्वचेसाठी संत्र्याच्या सालीचा फेसपॅक फायदेशीर!

संत्र्याची चव गोड आणि आंबट असते. हे फळ खूप रसाळ आहे. संत्र्याचा रस नियमितपणे पिणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यात व्हिटॅमिन सी, फोलेट आणि पोटॅशियम असते. संत्र्याचा आरोग्याच्या फायद्यांव्यतिरिक्त, अनेक सौंदर्य फायदे देखील आहेत.

Skin Care Tips : चमकदार त्वचेसाठी संत्र्याच्या सालीचा फेसपॅक फायदेशीर!
फेसपॅक

मुंबई : संत्र्याची चव गोड आणि आंबट असते. हे फळ खूप रसाळ आहे. संत्र्याचा रस नियमितपणे पिणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यात व्हिटॅमिन सी, फोलेट आणि पोटॅशियम असते. संत्र्याचा आरोग्याच्या फायद्यांव्यतिरिक्त, अनेक सौंदर्य फायदे देखील आहेत. बरेच लोक खाल्ल्यानंतर संत्र्याची साले फेकतात. ते त्वचेसाठी वापरले जाऊ शकते. संत्र्याची साल आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. (Orange peel face pack is beneficial for glowing skin)

संत्र्याची साल तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. हे अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्मांनी समृद्ध आहे. हे पुरळ आणि तेलकट त्वचेवर उपचार करण्यास मदत करते. संत्र्याची साल त्वचा उजळवणारे एजंट म्हणूनही काम करते. संत्र्याच्या सालीने तुम्ही अनेक प्रकारचे फेस पॅक बनवू शकता. संत्र्याच्या सालीचे फेसपॅक कसे तयार करायचे हे आपण बघूयात.

संत्र्याची साल, मुलतानी माती आणि गुलाबाच्या पाण्याचा फेसपॅक – 1 टिस्पून संत्र्याची साल पावडर, 1 टिबलस्पून मुलतानी माती आणि 1 टिबलस्पून गुलाबपाणी मिसळा. ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. 10 ते 15 मिनिटांनी चेहरा धुवा. हा फेसपॅक ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स काढून आपली त्वचा खोल स्वच्छ करू शकतो.

संत्र्याच्या सालीची पावडर आणि लिंबाचा फेसपॅक – टॅन काढून टाकण्यासाठी आणि रंग सुधारण्यासाठी हे एक उत्तम पॅक आहे. पेस्ट तयार करण्यासाठी 2 चमचे संत्र्याच्या सालीची पावडर, लिंबाचा रस काही थेंब आणि 1 टीस्पून मुलतानी माती किंवा चंदन पावडर मिसळा. चेहऱ्यावर लावा आणि 30 मिनिटांनंतर धुवा. हे मुरुम दूर करण्यास मदत करते. तेलकट त्वचेसाठी हा एक उत्तम फेसपॅक आहे. आपण आठवड्यातून 1 ते 2 वेळा वापरू शकता.

संत्र्याची साल, हळद आणि मध फेसपॅक – टॅन काढण्यासाठी हा फेस क्लींजर आहे. 1 टीस्पून संत्र्याच्या सालीची पावडर, 1 टीस्पून मध, 1 टीस्पून हळद मिसळून बारीक पेस्ट बनवा. 5 ते 10 मिनिटांनी चेहरा आणि मान पाण्याने धुवा. हे त्वचेला खोलवर स्वच्छ करण्यास मदत करते. आपण आठवड्यातून एकदा ते वापरू शकता.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Orange peel face pack is beneficial for glowing skin)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI