Skin Care Tips | त्वचेचा पोत जाणून निवडा नैसर्गिक घटक आणि उत्पादने, जाणून घ्या अधिक…

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jun 17, 2021 | 8:47 AM

बर्‍याच वेळा आपण बाजारातून महागड्या सौंदर्य उत्पादने खरेदी करून ती वापरतो. पण, ही उत्पादने आपल्या त्वचेला फायदेशीर ठरत नाहीत आणि आपल्याला अॅलर्जी किंवा इतर काही समस्या आढळतात.

Skin Care Tips | त्वचेचा पोत जाणून निवडा नैसर्गिक घटक आणि उत्पादने, जाणून घ्या अधिक...
स्कीन केअर
Follow us

मुंबई : बर्‍याच वेळा आपण बाजारातून महागड्या सौंदर्य उत्पादने खरेदी करून ती वापरतो. पण, ही उत्पादने आपल्या त्वचेला फायदेशीर ठरत नाहीत आणि आपल्याला अॅलर्जी किंवा इतर काही समस्या आढळतात. याचे कारण असे आहे की, काहीवेळा आपण आपल्या त्वचेचा टोन जाणून घेता, उत्पादन योग्य आहे की नाही, हे विचारात न घेताच ते खरेदी करतो, याचाच दुष्परिणाम नंतर दिसून येतो (Skin Care Tips know the type of your skin and choose the right products).

मात्र, हीच गोष्ट घरगुती घटक वापरताना देखील घडू शकते. अर्थात आपली त्वचा तेलकट, कोरडी किंवा संवेदनशील आहे की नाही, ते जाणून घेऊन, त्यानुसारच आपण नैसर्गिक घटकांचा वापर केला पाहिजे. जेणेकरून त्या वस्तूच्या वापराने आपल्याला परिपूर्ण परिणाम मिळतील. कोणत्या प्रकारच्या त्वचेवर कोणते नैसर्गिक घटक वापरावे, हे आज आपण जाणून घेऊया…

तेलकट त्वचा

जर आपली त्वचा तेलकट असेल तर आपण सिट्रिक आम्ल असणाऱ्या गोष्टी अर्थात स्ट्रॉबेरी, किवी, टोमॅटो, लिंबू आणि संत्री इत्यादी घटक वापरले पाहिजेत. हे घटक आपली त्वचा स्वच्छ करण्याबरोबरच, ते सीबम देखील नियंत्रित करतात. याशिवाय टी ट्री ऑईल, आर्गन ऑईल आणि जोजोबा तेल देखील आपल्या त्वचेसाठी खूप चांगले आहेत. कारण ते खूप हलके आहेत आणि आपले पोर्स बंद होऊ देत नाहीत. जर आपण स्किनकेअर उत्पादने खरेदी करू इच्छित असल्यास, सॅलिसिक आम्ल, बेंझॉयल पेरोक्साइड आणि चहाच्या झाडाचे अर्क असलेली उत्पादने निवडणे चांगले ठरेल.

कोरडी त्वचा

कोरड्या त्वचेसाठी बदाम तेल, ऑलिव्ह ऑईल आणि नारळ तेलाची मालिश करणे खूप चांगले आहे. दररोज झोपण्या अगोदर तोंड धुतल्यानंतर ही तेलं लावल्याने त्वचा खूप चमकदार आणि स्वच्छ होते. याशिवाय आपण केळी, काकडी, पपई आणि टोमॅटो इत्यादी नैसर्गिक गोष्टी देखील वापरू शकता. कोरडी त्वचा असलेल्यांसाठी हरभरा पीठ आणि मलईचा फेस पॅक देखील खूप चांगला मानला जातो. स्किनकेअर उत्पादने खरेदी करताना ग्लायकोलिक आम्ल, हायअल्यूरॉनिक आम्ल, पॅराफिन, बीस, पेट्रोलियम आणि शीआ बटर, कोरफड आणि कोको बटर सारख्या नैसर्गिक घटक असल्यास उत्तम.

कॉम्बिनेशन स्कीन

जर तुमची स्कीन, कॉम्बिनेशन स्कीम म्हणजेच कोरडे किंवा जास्त तेलकट त्वचा नसेल तर मध, दही आणि कोरफड यासारख्या गोष्टी तुमच्या त्वचेसाठी खूप चांगल्या आहेत. कॉफी, कोरफड, स्ट्रॉबेरी आणि जोजोबा सारख्या एक्सफोलीएटिंग आणि हायड्रेटिंग आम्ल असलेली उत्पादने वापरा. हे आपल्याला चांगले परिणाम देईल.

संवेदनशील त्वचा

जर आपली त्वचा संवेदनशील असेल, तर आपण दूध, ओट्सचे जाडे भरडे पीठ, कोरफड, नारळ तेल इत्यादी नैसर्गिक घटक वापरावे. त्याच वेळी, अशी उत्पादने निवडावी ज्यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. अशावेळी, कॅमोमाईल अर्क, फळांचा अर्क आणि नैसर्गिक तेलं आपल्या त्वचेवर चांगल्याप्रकारे काम करू शकतात.

(टीप : कोणत्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Skin Care Tips know the type of your skin and choose the right products)

हेही वाचा :

स्मार्ट फोनमुळे आपल्या त्वचेचेही होते नुकसान! जाणून घ्या याचे दुष्परिणाम

Weight Loss | वाढत्या वजनामुळे त्रस्त आहात? आहारात ‘हे’ हेल्दी कार्बोहायड्रेट फूड सामील करा आणि चिंतामुक्त व्हा!

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI