स्मार्ट फोनमुळे आपल्या त्वचेचेही होते नुकसान! जाणून घ्या याचे दुष्परिणाम

मोबाईल फोन हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. आपण याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करू शकत नाही. परंतु, दीर्घकाळ मोबाईल फोन वापरणे आपल्या आरोग्यास आणि त्वचेस हानी पोहोचवू शकते.

स्मार्ट फोनमुळे आपल्या त्वचेचेही होते नुकसान! जाणून घ्या याचे दुष्परिणाम
चेहर्‍यावरील पिंपल्स दूर करण्यासाठी टोमॅटोइतका चांगला दुसरा घटक नाही. टोमॅटो लाइकोपीनने समृद्ध असतो, यासाठी आपण झोपण्याच्या अगोदर टोमॅटोचा रस आपल्या त्वचेला लावला पाहिजे. (टीप : कोणत्याही आहार बदलापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

मुंबई : मोबाईल फोन हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. आपण याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करू शकत नाही. परंतु, दीर्घकाळ मोबाईल फोन वापरणे आपल्या आरोग्यास आणि त्वचेस हानी पोहोचवू शकते. गेल्या काही वर्षांत, मोबाईल फोनमधून उत्सर्जित हानिकारक रेडिएशनबद्दल शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. या किरणोत्सर्गाचा वाईट परिणाम आपल्या त्वचेवर आणि शरीराच्या अवयवांवर होतो (Smart phones also damage your skin know the side effects).

मोबाईल फोनमधून उत्सर्जित होणारे नॉन- ऑयनायजिंग रेडिएशन आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी एनर्जी आहे. या दोन्ही गोष्टी त्वचेसाठी अतिशय हानिकारक आहेत. तज्ज्ञांनी यासंदर्भातील समस्यांविषयी सांगितले आहे. मोबाईल फोनच्या अत्यधिक वापरामुळे त्वचेचे काय नुकसान होऊ शकते, ते आज आपण जाणून घेऊया…

त्वचेचा लालसरपणा आणि खाज सुटणे

डर्मेटीस ही एक जेनेरिक टर्म आहे, जी त्वचेवर सूज आल्यावर वापरली जाते. फोनचा जास्त वापर केल्याने चेहऱ्यावर लालसरपणा, खाज सुटणे आणि जळजळ होण्याची समस्या उद्भवू शकते.

फाईन लाईन्स आणि सुरकुत्या

कदाचित आपणास हे माहित नाही की, बराच काळ मोबाईल फोन वापरल्यामुळे चेहर्‍यावर फाईन लाईन्स आणि सुरकुत्या येतात. यामुळे, आपण वेळेआधीच वृध्द दिसू लागता. बराच वेळ मोबाईल फोनवर चॅटिंग करत असताना किंवा वाचत असताना आपण सतत मोबाईलच्या स्क्रीनकडे पाहत असतो. यामुळे कपाळावर बारीक रेषा दिसू लागतात.

डार्क सर्कल्स

मोबाईल फोनमधून निघणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे त्वचेवर पिग्मेंटेशन वाढते. रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरल्यामुळे आपल्या डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. याशिवाय आपल्या झोपेवर देखील वाईट परिणाम होतो. ज्यामुळे डोळ्याभोवती डार्क सर्कल्स दिसू लागतात.

त्वचेवर संक्रमण

मोबाईल फोनवर आजूबाजूच्या वातावरणात असलेले बरेच प्रकारचे जंतू आणि बॅक्टेरिया चिकटलेले असतात. हे बॅक्टेरिया आपल्या त्वचेला देखील संक्रमित करतात.

मानेवरील सुरकुत्या

दीर्घकाळ मोबाईल फोन वापरल्यामुळे मानेवर देखील सुरकुत्या येऊ शकतात आणि गळ्याची त्वचा काळपट आणि जाडसर दिसू लागते.

(Smart phones also damage your skin know the side effects)

हेही वाचा :

Healthy Drinks | शरीराला थंड आणि निरोगी ठेवायचंय? मग, ‘या’ पेयांचे सेवन ठरेल फायदेशीर!

Weight Loss | वाढत्या वजनामुळे त्रस्त आहात? आहारात ‘हे’ हेल्दी कार्बोहायड्रेट फूड सामील करा आणि चिंतामुक्त व्हा!

Skin Care Tips | ‘ब्लीच’ केल्यानंतर त्वचेवर जळजळ होतेय? मग, ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पाहा!

Protein Deficiency Symptoms : प्रोटीनची शरीरात कमतरता असल्याची ‘ही’ आहेत प्रमुख लक्षणे !