Skin Care Tips | ‘ब्लीच’ केल्यानंतर त्वचेवर जळजळ होतेय? मग, ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पाहा!

Skin Care Tips : ब्लीचिंगनंतर त्वचेवर जळजळ होणे ही एक सामान्य समस्या आहे. या जळजळीपासून आराम मिळवण्यासाठी आपण काही घरगुती उपचारांचा अवलंब करू शकता.

1/6
Skin Care
सुंदर त्वचा
2/6
त्वचेवरील जळजळ कमी करण्यासाठी थंड दूध वापरले जाऊ शकते. यासाठी कापसाचा बोळा थंड दुधात बुडवा आणि बाधित भागावर लावा. 15 ते 20 मिनिटांनंतर त्वचा स्वच्छ पाण्याने धुवा.
3/6
या जळजळीपासून आराम मिळवण्यासाठी बटाट्याचे साल देखील वापरता येतात. त्यात अनेक औषधी गुणधर्म आहे. यासाठी बटाट्याची साल बाधित भागावर लावा आणि थंड पाण्याने धुवा.
4/6
चंदर पावडरचा प्रभाव थंड आहे. यामुळे त्वचेची जळजळ कमी होण्यास मदत होते. यासाठी गुलाब पाण्यात चंदन पावडर मिसळा. ही पेस्ट प्रभावित ठिकाणी 10 ते 15 मिनिटांसाठी लावा आणि नंतर त्वचा स्वच्छ पाण्याने धुवा.
5/6
आपण प्रभावित भागावर बर्फाने मसाज करू शकता. यामुळे त्वचा थंड होईल आणि जळजळ कमी होईल.
6/6
आपण आपली बाधित त्वचा नारळ पाण्याने देखील स्वच्छ करू शकता. यामुळे त्वचेचा लालसरपणा कमी करण्यात मदत होऊ शकते.