AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care | सणासुदीच्या काळात ‘या’ चार गोष्टी मुरुमांपासून सुरक्षित ठेवतील!

वाढते प्रदूषण आणि व्यस्त जीवनशैलीमुळे आपण आपल्या त्वचेकडे म्हणावे तसे लक्ष देणे होत नाही. चेहर्‍यावर मुरुमांचा त्रास नेहमीच असतो.

Skin Care | सणासुदीच्या काळात ‘या’ चार गोष्टी मुरुमांपासून सुरक्षित ठेवतील!
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Dec 07, 2020 | 11:48 AM
Share

मुंबई : वाढते प्रदूषण आणि व्यस्त जीवनशैलीमुळे आपण आपल्या त्वचेकडे म्हणावे तसे लक्ष देणे होत नाही. चेहर्‍यावर मुरुमांचा त्रास नेहमीच असतो. बाहेर कुठेतरी जाण्यासाठी आपण प्लॅन करतो. मात्र, चेहर्‍यावरील मुरुमामुळे जाण्याच्या अगोदरच आपला मुड खराब होतो. आपल्या सर्वांना हे माहित आहे की, निरोगी आहार आणि पाणी पिण्यामुळे चेहऱ्यावरील मुरुम कमी होऊ शकतो. परंतु, अशा उपायात बराच वेळ लागतो. आपण या चेहऱ्यावरील मुरूमाला अतिशय सोप्या पध्दतीने दूर करू शकतो. (skin care tips to get rid pimples) कोरफड जेल कोरफड आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. कोरफड लावल्यानंतर आपली त्वचा मऊ पडते. कोरफड लावल्याने मुरूमाचे डाग देखील दिसत नाहीत. जर आपल्याला मुरुमांचा त्रास होत असेल तर, रात्री कोरफड किंवा कोरफडीचे जेल लावा.

टी-ट्री ऑइल टी-ट्री ऑइलमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. थोड्याशा नारळाच्या तेलामध्ये दोन थेंब टी-ट्री तेल घाला आणि चांगले एकजीव करा आणि मुरुमावर लावा, थोडा वेळानंतर कोमट पाण्याने धुवा. मध मध आपल्या आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठीही फायदेशीर आहे. मधात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीइन्फ्लेमेटरी असते. ज्यामुळे मुरुम कमी होण्यास मदत होते. मुरुमावर एक-दोन थेंब मध लावा आणि रात्रभर तसेच ठेवा आणि सकाळी पाण्याने चेहरा धुवा. ग्रीन टी ग्रीन टीमध्ये अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे मुरुमांचा दाह कमी होतो. ग्रीन टी त्वचेसाठी खूप चांगली आहे. ग्रीन टीच्या पिशव्या पाण्यात उकळा आणि थंड होऊ द्या. या चहाच्या पिशव्या थंड झाल्यावर मुरुमांवर लावा. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी आपण सर्वकाही वापरण्यापूर्वी स्वच्छ करून घेत आहोत. अशा परिस्थितीत आपण आपले मेकअपचे साहित्य कसे स्वच्छ करणार? ज्या प्रकारे आपले आरोग्य चांगले राहावे म्हणून आपण आपली त्वचा स्वच्छ ठेवतो आणि लक्ष देतो. त्याच प्रमाणे, आपण आपले मेकअप ब्रश, मस्कारा, लिपस्टिक, प्लिकर्स देखील स्वच्छ ठेवले पाहिजे आणि कोरोना काळात विशेष काळजी घेतली पाहिजे.

संबंधित बातम्या :

Weight Loss | वजन कमी करताय? या 5 गोष्टी आहारात नक्की समाविष्ट करा!

(skin care tips to get rid pimples)

Follow Us
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
Vilas Ghule Case | विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....हत्येचं मूळ कारण आलं समोर
फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री!
Uddhav Thackeray | फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री! आज शिर्डीत मोठं शक्तिप्रदर्शन