केस गळती रोखण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय करून पाहा, वाचा याबद्दल अधिक !

बहुतेक लोकांना गडद आणि दाट केस आवडतात. परंतु योग्य काळजी न घेतल्यामुळे, केस गळणे ही समस्या सामान्य झाले आहे.

केस गळती रोखण्यासाठी 'हे' घरगुती उपाय करून पाहा, वाचा याबद्दल अधिक !
कोरफड केसांच्या वाढीस मदत करते. कुरळे केस स्ट्रेट करण्यासाठी आपल्याला अर्धा कप नारळ तेलामध्ये अर्धा कप कोरफड मिसळावी लागेल. हे मिश्रण आपल्या केसांवर लावा. एक तास तसेच सोडा. त्यानंतर शैम्पूने आपले केस धुवा.
Follow us
| Updated on: May 13, 2021 | 12:26 PM

मुंबई : बहुतेक लोकांना गडद आणि दाट केस आवडतात. परंतु योग्य काळजी न घेतल्यामुळे, केस गळणे ही समस्या सामान्य झाले आहे. जर, आपल्यालाही केस गळून पडण्याची समस्या उद्भवत असेल, तर नारळ तेलात कढीपत्ता आणि आवळा घाला. तेलाचा रंग काळा होईपर्यंत हे तेल मिश्रण उकळवा. थंड झाल्यावर स्काल्प आणि केसांच्या मुळांवर हे तेल लावा. दुसर्‍या दिवशी केस स्वच्छ धुवा. (Special tips to prevent hair loss)

हिबिस्कस अर्थात जास्वंदाची आठ फुले व आठ पाने घ्या आणि त्यांना चांगले धुवून, त्याची बारीक पेस्ट बनवा. आता एका सॉसपॅन/तव्यामध्ये एक कप नारळ तेल गरम करा आणि त्यात ही पेस्ट घाला आणि एकदा ढवळा. नंतर गॅस बंद करा आणि सॉसपॅनला थोड्यावेळासाठी झाकून ठेवा. थंड झाल्यावर, ते एका कंटेनरमध्ये भरा आणि आठवड्यातून किमान तीन दिवस केसांवर लावा. यामुळे केस गळती कमी होते.

रीठा ही एक औषधी वनस्पती आहे, ज्यात लोहाचे प्रमाण अधिक आहे. लोह आपल्या केसांसाठी खूप उपयुक्त घटक आहे. रीठात असलेले अँटी-ऑक्सिडेंट्स आपल्या केसांच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचे आहेत. इन्व्हेस्टिगेटिव्ह डर्मेटोलॉजी जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखानुसार, रीठा एक उत्कृष्ट क्लिनिंग एजंट आहे, जो आपल्या केसांना कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून सुरक्षित ठेवतो. रीठ्यामुळे केस गळती कमी होते.

आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी कोरफड खूप उपयुक्त आहे. कोरफड, नारळ तेल आणि कांद्याचा रस यांचे तेल घरी तयार करून केसांना लावले तर केस गळतीची समस्या दूर होऊ शकते. तेल तयार करण्यासाठी सर्वात अगोदर कांदा बारीक किसून अथवा कांदा ज्यूसरमधून काढला तरी चालतो मात्र, कांद्याचा रस हा ताजा असावा. त्यानंतर कोरफड द्या कोरफडीचा बाजूचा सर्व भाग काढून टाका त्यानंतर कांद्याचा रस कोरफड आणि नारळाचे तेल एकत्र करा रोज हे तेल केसांना लावा यामुळे तुमचे केस सुंदर, जाड, लांब आणि मजबूत दिसतील.

अनेकजण केसाना रंग देणे, ब्लीच करणे, डाय करणे यासारखी केमिकल ट्रिटमेंट केसांवर अवलंबतात. यामुळे केस कमकुवत होऊन ते गळू लागतात. यामुळे केसांवर अशाप्रकारची केमिकल ट्रिटमेंट करण्यापूर्वी काळजी घ्या. केस गळतीचे कारण तुमची केस विंचरण्याची पद्धतही असू शकते. काही जण केसांचा गुंता झाल्यास केस विंचरताना ते खेचतात. त्यामुळे ते तुटतात. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, केस विंचरताना ते आरामात विंचरा, त्यांना मुळापासून ओढू नका. यामुळे केस कमजोर होऊन ते तुटतात.

संबंधित बातम्या : 

(Special tips to prevent hair loss)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.