Skin Care Tips : फक्त ‘या’ पाच गोष्टींची काळजी घ्या, तुमचा चेहरा टवटवीत राहील…

तुमची त्वचा तेजस्वी राहण्यासाठी तुमच्या रोजच्या रूटीनमध्ये काही बदल केले. काही सवयी लावून घेतल्या तर तुमची त्वचा निरोगी राहण्यास मदत होईल. फक्त या पाच सवयी तुमच्या तुमच्या त्वचेचं आरोग्य चांगलं राखू शकतात.

Skin Care Tips : फक्त 'या' पाच गोष्टींची काळजी घ्या, तुमचा चेहरा टवटवीत राहील...
Skin Care Tips : फक्त 'या' पाच गोष्टींची काळजी घ्या, तुमचा चेहरा टवटवीत राहील...
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

May 07, 2022 | 11:34 AM

मुंबई : आपली त्वचा कायम टवटवीत राहावी अशी आपली सगळ्यांचीच इच्छा असेत. चेहऱ्यावरची चमक कायम राहावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी आपण पार्लर आणि स्किन केअर ट्रीटमेंटवर खूप पैसा खर्च करतो. पण खरंतर चेहरा तरूण आणि चमकदार ठेवणण्यासाठी काही घरगुती उपाय कामी येतील. तुमची त्वचा तेजस्वी राहण्यासाठी तुमच्या रोजच्या रूटीनमध्ये काही बदल केले. काही सवयी लावून घेतल्या तर तुमची त्वचा निरोगी राहण्यास (Skin Care Tips) मदत होईल. फक्त या पाच सवयी तुमच्या तुमच्या त्वचेचं आरोग्य (Face Glowing Tips) चांगलं राखू शकतात.

सनस्क्रीनचा वापर करा

उन्हाळ्यात सनस्क्रीन वापरा. हे तुमची उन्हापासून संरक्षण करेल. हानिकारक किरणांमुळे त्वचेचे नुकसान होते. त्यामुळे जेव्हा तुम्ही घराबाहेर पडाल तेव्हा सनस्क्रीन लावूनच जा. त्यामुळे तुमच्या त्वचेचं रक्षण होईल. त्यातही तुमची त्वचा तेलकट असेल तर सनस्क्रीन जरूर वापरा.

दिवसातून 3 वेळा चेहरा धुवा

जर आपण आपला चेहरा व्यवस्थित स्वच्छ ठेवला तर अर्ध्या समस्या दूर होऊ शकतात.  चेहऱ्यावर साचलेली घाण आणि तेल हे त्वचेच्या बहुतांश समस्यांचे कारण असते. त्यामुळे दिवसातून तीनदा चेहरा स्वच्छ करा. सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुण्यास विसरू नका.

आठवड्यातून दोनदा स्क्रब करा

चेहऱ्यावरील मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यासाठी स्क्रब करणं फायदेशीर आहे. त्यामुळे आठवड्यातून दोनदा स्क्रब करा. पण हलक्या हाताने. यासाठी तुम्ही घरी बनवलेलं स्क्रबही वापरू शकता.

ब्युटी प्रोडक्ट्समध्ये या गोष्टी असाव्यात

जेव्हा तुम्ही कोणतंही ब्युटी प्रोडक्ट निवडता तेव्हा त्यामध्ये आवश्यक पोषण असेल याची खात्री करा. व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन इ, फॅटी ऍसिडस् अश्या गोष्टी असतील याची खात्री करा. जेणेकरून त्वचेला निरोगी बनवणारे घटक या ब्युटी प्रोडक्ट्स मिळू शकतील. यामुळे तुमची त्वचा दीर्घकाळ निरोगी आणि चमकदार राहील.

त्वचेवर हानिकारक गोष्टी वापरू नका

प्रत्येकाची त्वचा वेगवेगळी असते. त्यामुळे सर्व उत्पादने प्रत्येकासाठी योग्य असतीलच असं नाही. कोणतेही प्रोडक्ट लावल्यानंतर चेहऱ्यावर जळजळ, खाज सुटणे, पुरळ येणे इत्यादी समस्या येत असतील तर ते स्किन केअर प्रोडक्ट वापरणं आवश्यक असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

टीप- आम्ही केवळ आपल्यासाठी उपयुक्त असणारी माहिती पुरवत आहोत. पण वरील गोष्टींचा अवलंब करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या…

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें