Hair Care : ‘या’ 4 आयुर्वेदिक औषधी वनस्पती केसांसाठी अत्यंत फायदेशीर!

केस गळती थांबवण्यासाठी लोक अनेक प्रकारचे शॅम्पू, हेअर सीरम आणि हेअर मास्क वापरतात. मात्र, हे सर्व करूनही केस गळतीची समस्या काही कमी होत नाही. जर आपल्याला खरोखरच केस गळती थांबवायची असेल तर आपण काही आयुर्वेदिक उपचारांचा अवलंब केला पाहिजे

Hair Care : 'या' 4 आयुर्वेदिक औषधी वनस्पती केसांसाठी अत्यंत फायदेशीर!
केसांची काळजी

मुंबई : केस गळतीच्या समस्येमुळे अनेकजण त्रस्त आहेत. केस गळती थांबवण्यासाठी लोक अनेक प्रकारचे शॅम्पू, हेअर सीरम आणि हेअर मास्क वापरतात. मात्र, हे सर्व करूनही केस गळतीची समस्या काही कमी होत नाही. जर आपल्याला खरोखरच केस गळती थांबवायची असेल तर आपण काही आयुर्वेदिक उपचारांचा अवलंब केला पाहिजे. ज्यामुळे आपली केस गळतीची समस्या कायमची दूर होईल. (These 4 Ayurvedic herbs are extremely beneficial for hair)

आवळा

साधारण 4-5 ताजे आवळे घ्या आणि त्यांचे लहान तुकडे करा. आवळ्यातील बिया काढून टाका. अर्ध्या कप थंड खोबऱ्याच्या तेलात आवळाचे तुकडे घाला. हे गरम करण्यासाठी गॅसवर ठेवा. काही मिनिटे उकळू द्या आणि नंतर गॅस बंद करा. त्यानंतर आवळा तेल थोडे थंड होऊ द्या. चाळणीच्या साहाय्याने आवळ्याचे तुकडे तेलापासून वेगळे करा. स्वच्छ काचेच्या बाटलीत तेल भरा आणि थंड ठिकाणी ठेवा. या तेलाने काही वेळ तुमच्या टाळूची मालिश करा. एक तास सोडा. नंतर सौम्य शैम्पूने धुवा. आपण दर आठवड्यात 2 ते 3 वेळा हे वापरू शकता.

कोरफड

कोरफडीच्या पानातून जेल काढून एका वाडग्यात ठेवा. कोरफड जेल थेट टाळूवर लावा किंवा त्यामध्ये थोडे पाणी मिक्स करून केसांवर लावा. काही मिनिटांसाठी टाळूवर हळूवारपणे मालिश करा आणि सौम्य शैम्पूने धुण्यापूर्वी 40-45 मिनिटे सोडा. आपण आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा हे परत आपण वापरू शकता.

कढीपत्ता

काही कढीपत्त्याची पाने घ्या आणि ब्लेंडरमध्ये थोडे पाणी घाला आणि चांगली गुळगुळीत पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या टाळूवर लावा. 40-45 मिनिटे सोडा. ते धुण्यासाठी सौम्य शैम्पू वापरा. आपण आठवड्यातून 2-3 वेळा हे वापरू शकता.
जास्वंद

6-8 ताजी लाल जास्वंद फुले घ्या आणि पाकळ्या वेगळ्या करा. याशिवाय जास्वंदाची काही पाने घ्या. सर्वकाही चांगले धुवा. त्यांना ग्राइंडरमध्ये ठेवा आणि पेस्ट तयार करा. ते टाळूवर लावा आणि बोटांनी हलक्या हाताने मसाज करा. एक तास सोडा. यानंतर डोके सौम्य शैम्पूने धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(These 4 Ayurvedic herbs are extremely beneficial for hair)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI