Skin Care Tips : त्वचेला टॅनिंगपासून वाचवण्यासाठी ‘हे’ होममेड फेसपॅक वापरून पाहा!

सूर्यप्रकाश आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतो. हे आपल्या शरीराला व्हिटॅमिन डी मिळविण्यात मदत करते, परंतु जास्त सूर्यप्रकाश देखील हानिकारक असू शकतो. सुर्याच्या किरणामुळे आपल्या त्वचेचे नुकसान होते. जास्त सन टॅनमुळे आपली त्वचा निस्तेज आणि काळी होऊ शकते.

Skin Care Tips : त्वचेला टॅनिंगपासून वाचवण्यासाठी 'हे' होममेड फेसपॅक वापरून पाहा!
त्वचा
Follow us
| Updated on: Sep 11, 2021 | 7:43 AM

मुंबई : सूर्यप्रकाश आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतो. हे आपल्या शरीराला व्हिटॅमिन डी मिळविण्यात मदत करते, परंतु जास्त सूर्यप्रकाश देखील हानिकारक असू शकतो. सुर्याच्या किरणामुळे आपल्या त्वचेचे नुकसान होते. जास्त सन टॅनमुळे आपली त्वचा निस्तेज आणि काळी होऊ शकते. सूर्याच्या तेजस्वी किरणांचा शरीराच्या अंतर्गत आणि बाह्य आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. टॅन काढण्यासाठी तुम्ही काही घरगुती फेस पॅकचा अवलंब करू शकता. (This homemade face pack is beneficial for eliminating the problem of tanning)

-एका वाडग्यात एक चमचा ताजे पिळून काढलेला लिंबाचा रस घ्या. 3-4 थेंब ग्लिसरीन आणि थोडी साखर घाला जेणेकरून ती जाड पेस्ट होईल. काही मिनिटांसाठी हलक्या हाताने मालिश करा. साखरेचे दाणे विरघळू लागले की त्वचा स्वच्छ पाण्याने धुवा. आठवड्यातून दोनदा हा पॅक आपल्या चेहऱ्याला लावा.

-हा सर्वात सोपा स्क्रब आहे. त्यात टोमॅटो आहे जे ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते आणि वृद्धत्वविरोधी गुणधर्म देखील आहेत. यासाठी टोमॅटो अर्धा कापून त्यावर एक चमचा साखर पसरवा. हे स्क्रब चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने स्क्रब करा. आपली त्वचा साखरेने ओरखडणार नाही याची काळजी घ्या. यानंतर पाण्याने धुवा आणि नंतर मॉइश्चरायझर लावा.

-दही एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. जे सुरकुत्या आणि पुरळ कमी करण्यास देखील मदत करते. यासाठी एक चमचा दही घ्या आणि त्यात एक चमचा साखर मिसळा. त्यात थोडे मध घाला. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि कोरडी होऊ द्या. थोड्या वेळाने पाण्याने धुवा.

-तेलकट त्वचेची समस्या दूर करण्यासाठी बेसन पीठ आणि दह्याचा फेसपॅक अत्यंत फायदेशीर आहे. हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी चार चमचे बेसन पीठ आणि दोन चमचे दही घ्या. त्यानंतर हे चांगले मिक्स करून त्याची चांगली पेस्ट तयार करा. हा फेसपॅक संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि वीस मिनिटे ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा. हा फेसपॅक आपल्या चेहऱ्यावरील तेलकटपणा काढण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हा फेसपॅक आपण दररोज देखील लावू शकतो.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(This homemade face pack is beneficial for eliminating the problem of tanning)

Non Stop LIVE Update
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.