Skin Care : त्वचेसाठी फायदेशीर आहे हळद, ‘या’ प्रकारे करु शकता ट्राय

हळदमध्ये अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात ज्यामुळे त्वचा चमकते. हे आपल्या त्वचेवर एक नैसर्गिक चमक आणण्याचं काम करते. (Turmeric is beneficial for the skin, you can try it this way)

Skin Care : त्वचेसाठी फायदेशीर आहे हळद, 'या' प्रकारे करु शकता ट्राय
Follow us
| Updated on: Jul 24, 2021 | 6:19 PM

मुंबई : आपण सर्वजण आहारात मसाल्याच्या रुपात हळदीचा (turmeric) वापर करत असतो. यात अँटी ऑक्सिडंट आणि अँटी बॅक्टेरियाचे गुणधर्म आहेत. हळदमध्ये कर्क्युमिन असतं जे जखमांना त्वरित बरं करण्यास मदत करते. एवढंच नाही तर हळदीमध्ये औषधी गुणधर्मही आहेत. बर्‍याच कॉस्मेटिक उत्पादनांमध्येही याचा वापर केला जातो.

हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचा अँटीऑक्सिडेंट असतो जो त्वचेला नैसर्गिक चमक आणण्यासाठी मदत करतो. आपण याचा वापर डार्क सर्कल्स, त्वचेचा कोरडेपणा आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी करू शकता. आपण ते कसं वापरावं ते आम्ही तुम्हाला सांगतो.

चमकदार त्वचा

हळदमध्ये अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात ज्यामुळे त्वचा चमकते. हे आपल्या त्वचेवर एक नैसर्गिक चमक आणण्याचं काम करते. यासाठी एका वाटीत दही, मध आणि हळद मिसळून घ्या. या तीन गोष्टी चांगल्या प्रकारे मिसळल्यानंतर जाड पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहर्‍यावर आणि गळ्यावर 20 मिनिटे लावा आणि नंतर थंड पाण्याने धुवा.

मुरुमांपासून मुक्तता

मुरुम ही एक सामान्य समस्या आहे जी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असते. हळदीमध्ये अँटी-सेप्टिक गुणधर्म आहेत जे लालसरपणा आणि बॅक्टेरिया कमी करण्यास मदत करतात. यासाठी आपल्याला एक चमचा हळद, थोडासं दही आणि एक चमचा चिकणमाती आणि काही थेंब गुलाबाच्या पाण्याचा वापर करावा लागेल. हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि थोड्या वेळाने पाण्याने धुवा.

डार्क सर्कल्स

हळदीत असलेल्या अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मांमुळे डार्क सर्कल्स दूर होण्यास मदत होते. आपल्याला एक चमचा दही आणि 2 चमचे हळद पावडरसह 2 थेंब लिंबाचा रस घ्यावा लागेल. या सर्व गोष्टींचं मिश्रण करुन पेस्ट बनवा आणि डोळ्याच्या डार्क सर्कलवर लावा. हे मिश्रण सुमारे 15 ते 20 मिनिटं लावून ठेवा आणि नंतर पाण्याने धुवा.

स्ट्रेच मार्क्स दूर करते

स्ट्रेच मार्क्स दूर करण्यासाठी हळद वापरली जाऊ शकते. यासाठी तुम्हाला अर्धा चमचा हळदीत एक चमचा नारळाचं तेल मिसळावं लागणार. हे मिश्रण प्रभावित ठिकाणी सुमारे 1 तास ठेवा आणि नंतर ते पाण्याने धुवा. हा उपाय केल्यानं आपले स्ट्रेच मार्क्स फिकट होतात. आपण हा उपाय नियमितपणे वापरू शकता.

संदर्भात बातम्या

सतत कोरड्या खोकल्याने हैराण आहात? जाणून घ्या कारण आणि या खोकल्यावरचे घरगुती उपाय

आरोग्यदायी त्वचेसाठी करा हे नैसर्गिक उपाय; जाणून घ्या एक्सफोलिएटरचा वापर

चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी टोमॅटो, लसूण आणि गुलाब पाण्याचा ‘हा’ फेसपॅक चेहऱ्याला लावा!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.