AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शांततेत वेळ घालवायचा आहे? मग ऋषिकेशजवळील ‘या’ ठिकाणांना द्या भेट

आठवड्याच्या शेवटी किंवा 2 ते 3 दिवसांकरिता बाहेर फिरायला जायचं असेल तर ऋषिकेशला भेट द्या. इथे तुम्हाला शांततेत वेळ घालवण्याची संधी मिळेल. याशिवाय तुम्ही ऋषिकेशजवळील या सुंदर ठिकाणांना देखील एक्सप्लोर करू शकता.

शांततेत वेळ घालवायचा आहे? मग ऋषिकेशजवळील 'या' ठिकाणांना द्या भेट
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 29, 2025 | 12:36 AM
Share

प्रत्येकजण त्यांच्या व्यस्त जीवनातून कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतात. अनेकजण हे उन्हाळ्यात कुटुंब किंवा मित्रांसह डोंगराळ भागांवर आणि शांत ठिकाणी जाण्याचा विचार करतात. अशातच काही लोकं आठवड्याच्या शेवटी किंवा 2 ते 3 दिवसांच्या ट्रिपला जाण्याचा प्लॅन करत असतात. तर तुम्हालाही शांत ठिकाणी बाहेर फिरायला जायच असेल तर तुम्ही ऋषिकेशला जाऊ शकतात. हे ठिकाण उत्तराखंडचे एक धार्मिक आणि आध्यात्मिक शहर आहे, जे त्याच्या नैसर्गिक सौंदर्य आणि योगासाठी देखील प्रसिद्ध आहे. याला योगाची राजधानी असेही म्हणतात.

तुमचा वीकेंड किंवा काही वेळ शांततेत घालवायचा असेल तर तुम्ही ऋषिकेशला जाऊन तेथील ठिकाणं एक्सप्लोर करू शकता. तसेच येथील मंदिरांना भेट देण्याची आणि गंगा नदीच्या काठावर बसून शांततेत निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवू शकता. येथे तुम्ही जवळपासच्या अनेक ठिकाणी जाऊ शकतात आणि ॲक्टिव्हीटी करू शकता. चला तर मग आजच्या या लेखात आपण ऋषिकेशजवळील कोणती ठिकाण एक्सप्लोर करू शकतात ते जाणून घेऊयात…

राजाजी राष्ट्रीय उद्यान

तुम्ही ऋषिकेश येथील राजाजी राष्ट्रीय उद्यानाला भेट देण्यासाठी जाऊ शकता. हे ऋषिकेशपासून सुमारे 19 किमी अंतरावर आहे. बंगालच्या वाघापासून तरस आणि कोल्हा हे सर्व तुम्हाला येथील घनदाट जंगलात पाहायला मिळतील. याशिवाय, हरण, पक्षी आणि प्राण्यांच्या इतर अनेक प्रजाती येथे पाहता येतात. जर तुम्हीही ऋषिकेशला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही हे ठिकाण देखील एक्सप्लोर करू शकता.

कौडियाला

तुम्ही ऋषिकेशजवळील कौडियालाला भेट देण्याचा प्लॅन देखील आखू शकता. येथील नैसर्गिक सौंदर्य तुमच्या मनाला मोहित करेल. ज्यांना निसर्ग फोटोग्राफी आवडते त्यांच्यासाठी हे ठिकाण परिपूर्ण असेल. हे ठिकाण रिव्हर राफ्टिंगसाठी देखील खूप प्रसिद्ध आहे. येथील सूर्यास्त खूप मनमोहक आहे, हे ऋषिकेशपासून सुमारे 40 किमी अंतरावर आहे.

शिवपुरी

शिवपुरी हे ऋषिकेशपासून सुमारे 19 किमी अंतरावर आहे. या पवित्र ठिकाणी अनेक शिवमंदिरे आहेत. इथे तुम्हाला शांततेत काही वेळ घालवता येणार आहे. या ठिकाणी हिरव्यागार पर्वतांमधून वाहत असलेली गंगा नदीचे दृश्य तुमचे मन मोहून टाकेल. रात्रीच्या वेळी निरभ्र आकाशातील तारे पाहण्याची संधी तुम्हाला मिळेल. तुम्ही गंगा नदीत रिव्हर राफ्टिंग देखील करू शकता. शिवपुरीमध्ये कॅम्पिंग करताना, तुम्ही रिव्हर-राफ्टिंग, रॉक क्लाइंबिंग, क्लिफ जंपिंग आणि रॅपलिंग सारख्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हीटी करू शकता.

ब्यासी

ऋषिकेशजवळील ब्यासी गाव व्हाईट वॉटर राफ्टिंग आणि बंजी जंपिंगसाठी खूप प्रसिद्ध आहे. गर्दीपासून दूर शांततेत वेळ घालवू इच्छिणाऱ्यांसाठी हे ठिकाण परिपूर्ण असेल. हे ठिकाण ऋषिकेशपासून सुमारे 30 किमी अंतरावर आहे.

Follow Us
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....