स्वयंपाक घरातील जळालेली भांडी होतील एकदम स्वच्छ, या पद्धतीने घरीच तयार करा पावडर

घरात असलेली भांडी दररोज वापरली जातात. मात्र त्यावरील काळे डाग आणि जळालेले डाग सहजासहजी निघत नाहीत. ते डाग काढण्यासाठी तुम्ही तर घरगुती पावडरचा तुम्ही उपयोग करू शकता.

स्वयंपाक घरातील जळालेली भांडी होतील एकदम स्वच्छ, या पद्धतीने घरीच तयार करा पावडर
Follow us
| Updated on: Jan 03, 2025 | 8:17 PM

भारतीय स्वयंपाक घरातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भांडे आहेत. स्वयंपाक घर लखलखीत आणि स्वच्छ दिसण्यासाठी गृहिणी सतत प्रयत्न करत असतात. त्यामुळे भांड्यांची स्वच्छता हा प्रत्येक घराच्या गृहिणीचा महत्त्वाचा भाग आहे. अशा परिस्थितीत काही वेळा भांडे जळून कोळशासारखी होतात. स्वयंपाक घरातील सर्वच भांडी दररोज वापरली जात नाही. जी भांडे दररोज वापरली जातात ती स्वयंपाक झाल्यानंतर स्वच्छ केली जातात. पण रोज स्वच्छ करूनही काही भांड्यांचा काळेपणा जात नाही तर तो दिवसेंदिवस वाढत जातो.

काळे झालेले भांडे कसे स्वच्छ करायचे?

स्वयंपाक करताना अनेकदा भांडे काळे होतात. या भांड्यांचा काळेपणा कसा दूर करायचा हा प्रश्न अनेकांना पडतो जर तुम्हालाही ही समस्या असेल तर जाणून घेऊ काळे झालेले भांडे सहज स्वच्छ करण्याच्या काही सोप्या टिप्स. ज्या वापरून तुम्ही भांड्यावरचा काळपटपणा सहज काढू शकाल.

घरीच तयार करा पावडर

  • साहित्य
  • गव्हाचे पीठ अर्धी वाटी
  • डिटर्जंट पावडर चार चमचे
  • मीठ चार चमचे
  • सायट्रिक ऍसिड एक चमचा
  • हळद पावडर एक चमचा

कृती

हे सुद्धा वाचा

स्वयंपाक घरातले काळे झालेले भांडे स्वच्छ करण्यासाठी तुम्ही घरीच पावडर बनवू शकता. यासाठी सर्वप्रथम अर्धी वाटी गव्हाचं पीठ, चार मोठे चमचे डिटर्जंट पावडर, चार मोठे चमचे मीठ, एक चमचा सायट्रिक ऍसिड आणि एक चमचा हळद पावडर घ्या आणि ते एका भांड्यात टाका. भांड्यामध्ये घेतल्यानंतर हे सर्व व्यवस्थित मिक्स करा. तुमची पावडर तयार आहे.

अशी वापरा पावडर

या पावडरने भांडे स्वच्छ करण्यासाठी आधी भांडे पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर घासणीच्या किंवा स्क्रबरच्या मदतीने भांड्याच्या काळया झालेल्या भागावर ही पावडर लावा आणि व्यवस्थित घासून घ्या. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. ही पावडर वापरून भांडे अगदी सहज स्वच्छ होतील. ही पावडर वापरून तुम्ही तुमचे काळे झालेले भांडे, जळालेले भांडे सहज स्वच्छ करू शकतात.

पतीकडून पत्नीची हत्या अन् बनवला व्हिडीओ... कारण ऐकून बसेल धक्का
पतीकडून पत्नीची हत्या अन् बनवला व्हिडीओ... कारण ऐकून बसेल धक्का.
नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर हातोडा, कित्येक कुटुंब बेघर
नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर हातोडा, कित्येक कुटुंब बेघर.
'बाळासाहेब नसते तर काय झालं असतं?' 'सामना' अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?
'बाळासाहेब नसते तर काय झालं असतं?' 'सामना' अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?.
'बाळासाहेबांना भारतरत्न द्या', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी
'बाळासाहेबांना भारतरत्न द्या', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी.
नितेश राणेंची सैफच्या हल्ल्यावर शंका, 'मला संशय, खरंच चाकू मारला की..'
नितेश राणेंची सैफच्या हल्ल्यावर शंका, 'मला संशय, खरंच चाकू मारला की..'.
ट्रम्पच्या नव्या धोरणामुळे अमेरिकेतील 20 हजार भारतीय मायदेशी परतणार?
ट्रम्पच्या नव्या धोरणामुळे अमेरिकेतील 20 हजार भारतीय मायदेशी परतणार?.
वाल्मिक कराडला आर्थर जेलमध्ये ठेवा, दमानियांची मागणी, तर जरांगे म्हणता
वाल्मिक कराडला आर्थर जेलमध्ये ठेवा, दमानियांची मागणी, तर जरांगे म्हणता.
Saif Ali Khan Attacked : 'सैफवर जीवघेणा हल्ला तर 'तो' इतका फिट कसा?'
Saif Ali Khan Attacked : 'सैफवर जीवघेणा हल्ला तर 'तो' इतका फिट कसा?'.
एक अफवा,11 जणांचा मृत्यू, पुष्पकमधून उड्या, दुसऱ्या बाजून ट्रेनन चिरडल
एक अफवा,11 जणांचा मृत्यू, पुष्पकमधून उड्या, दुसऱ्या बाजून ट्रेनन चिरडल.
जळगावात रेल्वे अपघातातील ११ बळी प्रवाशांची ओळख पटविण्याचे काम सुरु
जळगावात रेल्वे अपघातातील ११ बळी प्रवाशांची ओळख पटविण्याचे काम सुरु.