AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

न्यू इअरसाठी अजून प्लॅन केला नाहीये? तर घरच्या घरीच अशा पद्धतीने करा सेलिब्रेट

बहुतेक लोकं नवीन वर्षाच स्वागत करण्यासाठी बाहेर आवडत्या ठिकाणी जाऊन किंवा बाहेर पार्टी करून साजरा करतात. पण जर तुमचे कोणतेही नियोजन नसेल, तर तुम्ही घरी वेगळ्या पद्धतीने नवीन वर्षाचा दिवस साजरा करू शकता. चला तर मग आजच्या लेखात आपण घरी नवीन वर्ष साजरे करण्याचे पाच आयडियाज जाणून घेऊयात...

न्यू इअरसाठी अजून प्लॅन केला नाहीये? तर घरच्या घरीच अशा पद्धतीने करा सेलिब्रेट
New Year Home Decoration
| Edited By: | Updated on: Dec 28, 2025 | 12:03 PM
Share

अवघ्या काही दिवसानी नवीन वर्ष 2026 चे आगमन होणार आहे. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकजण पार्टीच्या तयारी करत आहेत. काही जण डोंगर भागांमध्ये जाऊन सेलिब्रेट करतात तर काहीजण मित्रांसोबत पार्टीचे नियोजन करत आहेत. तथापि असे बरेच लोकं आहेत जे कोणत्याही कारणास्तव बाहेर जाण्याचा किंवा नवीन वर्ष साजरा करण्याचा प्लॅन अद्याप केलेला नाही. जर तुमच्याकडे नवीन वर्षासाठी काही खास प्लॅन झाला नसेल तर निराश होण्याची गरज नाही. खरं तर घरी राहूनही तुमचे नवीन वर्षाचे स्वागत बाहेर जाण्याइतकेच खास आणि संस्मरणीय बनू शकतात.

आपलं घर हे सर्वात आरामदायी आणि बिंधास्त वावरण्याचं एक ठिकाणं आहे आणि प्रियजनांसोबत घालवलेला वेळ हा नवीन वर्षाची सुरुवात करण्याचा सर्वोत्तम मार्ग मानला जातो. थोडी तयारी, थोडी सर्जनशीलता आणि सकारात्मक दृष्टिकोनाने तुम्ही तुमचे घर एका सेलिब्रेशन वातावरणात बदलू शकता. तर या लेखात, घरी नवीन वर्ष कसे साजरे करू शकता त्या आयडियाज जाणून घेऊयात.

1. घर सजवा आणि वातावरण तयार करा

नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मक उर्जेने झाली पाहिजे. तुम्ही तुमचे घर दिवे, लाईटींग किंवा लहान सजावटीच्या वस्तूंनी सजवून एक उत्सवी वातावरण निर्माण करू शकता. आनंददायी वातावरण निर्माण करण्यासाठी तुमचे आवडतं गाणं लावा.

2. तुमच्या कुटुंबासोबत खास जेवणाची प्लॅन करा

तुम्ही तुमच्या कुटुंबासह घरी नवीन वर्ष साजरे करू शकता. रात्रीच्या जेवणाचा मस्त बेत तुम्ही करू शकता. आवडीचे काही खास पदार्थ बनवा. बाहेरून काही पदार्थ मागवा. एक सुंदर टेबल सजवा आणि हलके संगीत वाजवत एकत्र जेवण करा. हे वातावरण कुटुंबाला जवळ आणेल आणि एकत्र वेळ घालवण्याची एक उत्तम संधी देईल.

3. चित्रपट पाहण्याची रात्रीचा प्लॅन करा

तुम्ही जर तुमच्या कुटुंबासोबत किंवा जोडीदारासोबत असाल तर तुम्ही नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आवडीचा चित्रपट पाहण्याची योजना करू शकता. चित्रपट पाहण्याआधी हलका नाश्ता तयार करा एकत्र चित्रपट पाहण्यात एक वेगळाच आनंद असतो.

4. घरी एकत्र या

तुमचे मित्र आणि कुटुंबातील इतर नातेवाईकांना नवीन वर्षाच्या स्वागत करण्यासाठी तुम्ही त्यांना आमंत्रित करू शकता आणि एक छोटी पार्टी आयोजित करू शकता. संगीत, नृत्य आणि नाश्त्याची व्यवस्था करा. तसेच, मनोरंजक वातावरण तयार करण्यासाठी काही खेळांचा समावेश करा. एकत्र नवीन वर्ष साजरे केल्याने ते एक संस्मरणीय वर्ष बनेल.

5. स्वतःसाठी वेळ काढा

तुम्ही एकटे असलात तरी, तुम्ही नवीन वर्षाचा दिवस खास बनवू शकता. चित्रपट, वेब सिरीज पाहताना किंवा पुस्तक वाचताना तुमचा आवडता पदार्थ बनवा आणि त्याचा आनंद घ्या. याव्यतिरिक्त, डायरी लिहा, ध्येये निश्चित करा आणि तुमच्या बाल्कनीतून फटाके वाजवण्याचा आनंद घ्या. नवीन वर्षाच्या दिवशी खूप आवाज करणे आवश्यक नाही. तुम्ही नवीन वर्षाचा दिवस शांतपणे आणि एकटे देखील साजरा करू शकता.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत.)

काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती.
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य.
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?.
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.