AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टॅनिंग आणि सनबर्नमध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या यावरील घरगुती उपाय

उन्हाळ्यात सनबर्न आणि टॅनिंग सारख्या समस्या अनेकदा उद्भवतात. ज्यामुळे आपल्या त्वचेचे सौंदर्य कमी होते. पण असे बरेच लोकांना सनबर्न आणि टॅनिंगमधील फरक समजत नाही. ते या समस्यांना एकच मानतात. अशातच आपण आजच्या या लेखात जाणून घेऊया सनबर्न आणि टॅनिंगमध्ये काय फरक आहे आणि या दोघांपैकी कोणते त्वचेला जास्त त्रास देते. त्यात यावरील घरगुती उपाय कोणते तेही जाणून घेऊयात...

टॅनिंग आणि सनबर्नमध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या यावरील घरगुती उपाय
skin problems sun burnImage Credit source: Catherine Falls Commercial/Moment/Getty Images
Follow us
| Updated on: May 21, 2025 | 1:50 AM

उन्हाळ्यात कडक सूर्यप्रकाशामुळे सनबर्न आणि टॅनिंग सारख्या त्वचेच्या अनेक समस्या उद्भवतात. तर या समस्या टाळण्यासाठी बरेच लोकं बाजारात उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या प्रॉडक्टचा वापर करतात, तरीही त्यांची या समस्येपासून सुटका होत नाही आणि त्वचा निस्तेज आणि खराब दिसू लागते. टॅनिंग आणि सनबर्न टाळण्यासाठी अनेक मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही या समस्येपासून आराम मिळवू शकता. पण प्रश्न असा आहे की टॅनिंग आणि सनबर्नमध्ये काय फरक आहे. बहुतेक लोकं या दोन्ही समस्यांना एकसारखेच मानतात पण तसे नाही. या लेखात आम्ही तुम्हाला टॅनिंग आणि सनबर्नमध्ये काय फरक आहे ते सांगणार आहोत. तुम्ही यापासून कसे मुक्त होऊ शकता किंवा ते कसे कमी करू शकता हे देखील जाणून घेऊयात…

खरंतर सनबर्न आणि टॅनिंगमुळे तुमची त्वचा खराब होऊ लागते. ही समस्या सहसा अशा लोकांमध्ये जास्त आढळते जे जास्त वेळ उन्हात काम करत असतात. कारण तीव्र सूर्यप्रकाशाची हानिकारक किरणे त्यांच्या त्वचेवर पडतात, ज्यामुळे चेहऱ्यावर टॅनिंग किंवा सनबर्न सारख्या समस्या उद्भवू लागतात.

सनबर्न म्हणजे काय?

सनबर्नची समस्या तीव्र सूर्यप्रकाशामुळे होते आणि त्यामुळे त्वचेवर जळजळ होऊ लागते. सूर्यकिरणांच्या जास्त संपर्कामुळे चेहऱ्यावर डाग, खाज सुटणे आणि लालसरपणा येतो, ज्याला सनबर्न म्हणतात. कधीकधी ही समस्या इतकी गंभीर होते की चेहऱ्यावर फक्त जळजळच नाही तर सूज देखील येते.

टॅनिंग म्हणजे काय?

तीव्र सूर्यप्रकाशामुळे आपल्या त्वचेचा रंगामध्ये बदल होऊ लागतो म्हणजेच तुमच्या त्वचेचा काही भाग एकदम गडद दिसू लागतो. तेव्हा त्याला स्किन टॅनिंग म्हणतात. कोणतीही जळजळ किंवा पुरळ नाही, फक्त तुमच्या त्वचेचा रंग बदलतो. तुमचा रंगही काळवंडतो. तज्ञांच्या मते, ते सहजासहजी काढता येत नाही.

यापैकी कोणता त्वचेवर जास्त परिणाम करतो – सनबर्न की टॅनिंग?

सनबर्न आणि टॅनिंग दोन्हीचा त्वचेवर वाईट परिणाम होतो. सनबर्नमुळे त्वचेच्या समस्या अधिक होतात कारण या स्थितीत चेहरा लाल होतो, खाज सुटते आणि जळजळ होणे यासारख्या समस्या उद्भवू लागतात. टॅनिंगमुळे तुमचा रंग काळवंडत असला तरी, तुम्हाला खाज सुटणे, जळजळ होणे आणि पुरळ येणे यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत नाही.

सनबर्न आणि टॅनिंगवर जलद उपाय काय आहे?

उन्हाळ्यात कडक उन्हामुळे सनबर्न आणि टॅनिंग या दोन्ही समस्या उद्भवतात. या दोन्हीपैकी, त्वचेला सर्वात जास्त त्रास देणारी स्थिती म्हणजे सनबर्न आणि ती लवकर बरीही होत नाही. जर आपण टॅनिंगबद्दल बोललो तर ते त्वचेला त्रास देत नाही तर ती काळ्या रंगाची असते. म्हणून तुम्ही काही घरगुती उपाय वापरूनही टॅनिंग कमी करू शकता.

उन्हाळ्यात त्वचेची अशी घ्या काळजी

जर तुम्हाला उन्हाळ्यात सनबर्न आणि टॅनिंगची समस्या येत असेल तर ते कमी करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांचा अवलंब करू शकता. यासाठी तुम्ही मुलतानी मातीमध्ये गुलाबपाणी मिक्स करून फेसपॅक बनवू शकता आणि हा पॅक तुमच्या चेहऱ्यावर लावू शकता. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर कोरफडीचे जेल लावू शकता. हळद, बेसन, दूध मिसळून त्याची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावल्याने टॅनिंग आणि सनबर्नच्या समस्येपासून आराम मिळतो.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे.
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!.
राजकोट किल्ला पर्यटकांसाठी बंद; मोठं कारण आलं समोर
राजकोट किल्ला पर्यटकांसाठी बंद; मोठं कारण आलं समोर.
युतीच्या चर्चा अन् संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंना टोला
युतीच्या चर्चा अन् संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंना टोला.
कुणाच्या तिजोरीतील पैसे लुटणार आहात? राऊतांचा अजित पवारांना टोला
कुणाच्या तिजोरीतील पैसे लुटणार आहात? राऊतांचा अजित पवारांना टोला.
महिला पायलटचा लैंगिक छळ; धावत्या कॅबमध्ये नको ते घडलं, 3 जणांवर गुन्हा
महिला पायलटचा लैंगिक छळ; धावत्या कॅबमध्ये नको ते घडलं, 3 जणांवर गुन्हा.
ज्ञानोबा, तुकोबांची पालखीचं दिवेघाटातलं विहंगम दृश्य
ज्ञानोबा, तुकोबांची पालखीचं दिवेघाटातलं विहंगम दृश्य.
शिंदे सेनेकडून ठाण्यात ठाकरेंना डिवचणारे बॅनर, नेमकं काय म्हटलंय?
शिंदे सेनेकडून ठाण्यात ठाकरेंना डिवचणारे बॅनर, नेमकं काय म्हटलंय?.
अजित पवार यांच्याकडून गावोगावी बूथ पाहणी
अजित पवार यांच्याकडून गावोगावी बूथ पाहणी.