आम तो आम…. त्याची सालंही फायदेशीर, आंब्याच्या सालीचे फायदे ऐकून व्हाल तुम्ही हैराण !

आंबा खाल्ल्यावर आपण त्याची सालं आणि बी किंवा कोय फेकून देतो. पण ही बातमी वाचून तुम्ही कधीच सालं फेकून देणार नाही.

आम तो आम.... त्याची सालंही फायदेशीर, आंब्याच्या सालीचे फायदे ऐकून व्हाल तुम्ही हैराण !
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Apr 08, 2023 | 7:40 AM

नवी दिल्ली : उन्हाळा येताच बाजारात आंब्याच्या (Mangoes) घमघमाटाने वातावरण मोहरून जातं. असे खूपच कमी लोक असतील ज्यांना आंबा खायला आवडत नसेल. पण साधारणपणे आंबा खाताना आपण त्याची सालं (mango peels) आणि बी किंवा आंब्याची कोय टाकून देतो. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आंबा जितका रसाळ आणि मधुर असतो, तितकीच फायदेशीर त्याची सालंही (benefits of mango peels)असतात. त्याचे इतके फायदे आहेत, ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. आज आपण आंब्याच्या सालीचे फायदे जाणून घेऊया.

आंब्याची साले आरोग्यासाठी फायदेशीर असतात

सुरकुत्यांपासून आराम मिळेल

ज्यांना चेहऱ्यावर नको असलेल्या सुरकुत्यांचा त्रास आहे त्यांच्यासाठी आंब्याची साल रामबाण उपाय म्हणून काम करू शकते. यासाठी प्रथम आंब्याची साल वाळवून घ्यावी. नंतर ती बारीक वाटून घ्या आणि त्यात गुलाबपाणी मिसळून ती पेस्ट चेहऱ्यावर लावावी. हे नियमितपणे लावल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतात आणि चेहरा अधिक चमकतो.

कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो

आंब्याच्या सालीमध्ये असे बरेच नैसर्गिक घटक आढळतात, ज्यामुळे शरीरात मृत पेशींची वाढ थांबते. त्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो. एवढेच नाही तर शरीर स्लिम-ट्रिम राहते.

आंब्याच्या सालीमध्ये हे गुणधर्म आढळतात

आंब्याच्या सालीमध्ये कॉपर, फोलेट आणि जीवनसत्त्वे, B6, A आणि C मुबलक प्रमाणात आढळतात. या सालींमध्ये मुबलक प्रमाणात फायबर देखील आढळते. ज्याचा वापर सेंद्रिय खत म्हणून केला जातो.

पिंपल्सपासून मिळते मुक्ती

उन्हाळ्यात चेहऱ्यावर मुरुमे आणि पुरळ येणं सामान्य गोष्ट आहे. या पिंपल्सवर आंब्याची साल लावल्याने यापासून कायमची सुटका होऊ शकते. यासाठी प्रथम आंब्याची साल बारीक करून त्याची पेस्ट तयार करा. आणि नंतर ते पिंपल्सवर लावा. काही दिवसातच तुम्हाला मुरुमांपासून मुक्ती मिळेल असे दिसेल.

अँटिऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध

आंब्याच्या सालीमध्ये अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. हे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासूनही संरक्षण करते. माहितीसाठी सांगतो की, हे फ्री रेडिकल्स डोळे, हृदय आणि त्वचेसाठी खूप धोकादायक असतात. आंब्याच्या सालीच्या मदतीने तुम्ही यापासून सुटका मिळवू शकता.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.