AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिळ्या चपात्या, भाकरी खाल्ल्यानं खरच वजन वाढतं का? धक्कादायक माहिती समोर

जवळपास सर्वच भारतीय कुटुंबांमध्ये रात्रीच्यावेळी गरजेपेक्षा जास्त जेवण बनवण्याची पद्धत आहे. अनेकदा हे उरलेलं जेवण सकाळी नाष्टा म्हणून दिलं जातं, परंतु यामुळे खरच वजणावर काही परिणाम होतो का? जाणून घेऊयात.

शिळ्या चपात्या, भाकरी खाल्ल्यानं खरच वजन वाढतं का? धक्कादायक माहिती समोर
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 28, 2025 | 8:31 PM
Share

जवळपास सर्वच भारतीय कुटुंबांमध्ये रात्रीच्यावेळी गरजेपेक्षा जास्त जेवण बनवण्याची पद्धत आहे. रात्री जेवण जास्त बनवल्यामुळे ते सकाळी उरतं. अशावेळी अनेक घरांमध्ये सकाळच्या नाष्ट्याला रात्रीच्या उरलेल्या शिळ्या चपात्या किंवा भाकरी दिल्या जातात. मात्र काही जणांना या शिळ्या चपात्या किंवा भाकरी खाणं आवडत नाही. कारण त्यांना नाष्ट्यामध्ये ताजे आणि चमचमीत पदार्थ खायला आवडतात. तर काही घरांमध्ये ज्या शिळ्या चपात्या उरल्या आहेत, त्यांना टाकाऊ समजून फेकून दिलं जातं. मात्र तुम्हाला माहीत आहे का, की शिळी चपाती खाल्ल्यामुळे तुमच्या शरीराला अनेक प्रकारे फायदा होऊ शकतो.

होय तुम्ही बरोबर ऐकलं आहे. शिळी चपाती खाल्ल्यामुळे तुमच्या शरीराला अनेक प्रकारचे फायदे होऊ शकतात.जर तुमचं वजन कमी आहे, काहीही केलं तरी तुमचं वजन वाढतच नाही, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही शिळी चपाती किंवा भाकरी दुधासोबत खावू शकतात. जर तुम्ही नियमीतपणे काही दिवस शिळी भाकरी किंवा चपाती दुधासोबत खाल्ली तर तुमचं वजन वाढण्यास मदत होते.

शिळी चपाती दुधासोबत खाल्ल्यास केवळ वजनच नाही वाढत तर शरिराला इतर देखील अनेक लाभ मिळतात. शिळ्या चपातीमध्ये फायबर, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट, प्रोटीन, आयरन, मॅग्नेशियम, झिंक, आणि बी व्हिटॅमीन मोठ्या प्रमाणात असतं.तसेच दुधाला तर पूर्ण अन्न म्हटलं आहे. दुधामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी 12 आणि रायबोफ्लोविन सारखे घटक असतात. त्यामुळे जर तुम्ही सकाळच्या वेळी दूध आणि शिळी पोळी किंवा भाकरी खाल्ल्यास तुमच्या शरीराच्या अनेक घटकांच्या गरजा पूर्ण होतात, तसेच तुमचं वजन वाढण्यास मदत होते.

शिळी पोळी खाल्ल्याने वजन वाढतं का?

शिळ्या पोळीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आणि प्रोटीन असतं, जे तुमचं वजन वाढवण्यास मदत करतं. तसेच तुमचं आरोग्य उत्तम ठेवण्यास देखील यामुळे मदत होते. जर तुम्ही दुधासोबत शिळी पोळी खाल्ली तर तुमचं वजन वाढू शकतं. मात्र लक्षात ठेवा ही पोळी एका दिवसापेक्षा अधिक शिळी नसावी, तसेच ती खराब झालेली नसावी. रात्रीच्यावेळी पोळ्या शक्यतो दमट वातावरणामध्ये ठेवू नये.

(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
CBSE च्या पोर्टलवर मोठ्या सायबर हल्ल्याचा प्रयत्न, फक्त दोनच मिनिटांत
CBSE च्या पोर्टलवर मोठ्या सायबर हल्ल्याचा प्रयत्न, फक्त दोनच मिनिटांत.
कचऱ्याने हैराण नागरिक आक्रमक; MIDC कार्यालयाबाहेर टाकला कचऱ्याचा ढीग,
कचऱ्याने हैराण नागरिक आक्रमक; MIDC कार्यालयाबाहेर टाकला कचऱ्याचा ढीग,.
ठाकरेंचा विश्वासू नेता हे काय बोलून गेला, बड्या खासदाराविषयी केलं सूचक
ठाकरेंचा विश्वासू नेता हे काय बोलून गेला, बड्या खासदाराविषयी केलं सूचक.
महागाईविरोधात ठाकरे सेनेचा एल्गार! भायखळ्यात रस्त्यावर उतरले शिवसैनिक
महागाईविरोधात ठाकरे सेनेचा एल्गार! भायखळ्यात रस्त्यावर उतरले शिवसैनिक.
आता हातभट्टीला सरकारने थेट...पुण्याच्या दारुकांडानंतर रामदास आठवलेंची
आता हातभट्टीला सरकारने थेट...पुण्याच्या दारुकांडानंतर रामदास आठवलेंची.
विखे लवकरच भिकेला लागणार, संजय राऊतांचा विखे-पाटलांवर घणाघात
विखे लवकरच भिकेला लागणार, संजय राऊतांचा विखे-पाटलांवर घणाघात.
सर्वात मोठी घडामोड! 447.27 कोटींचा तो आदेश रद्द... रिलायन्सला सर्वोच्च
सर्वात मोठी घडामोड! 447.27 कोटींचा तो आदेश रद्द... रिलायन्सला सर्वोच्च.
NEET घोटाळ्याविरोधात रस्त्यावर उतरली युवा काँग्रेस; सरकारविरोधात....
NEET घोटाळ्याविरोधात रस्त्यावर उतरली युवा काँग्रेस; सरकारविरोधात.....
काँग्रेसची शाल घालून सुप्रिया सुळेंच स्वागत; म्हणाल्या, माझा काँग्रेस
काँग्रेसची शाल घालून सुप्रिया सुळेंच स्वागत; म्हणाल्या, माझा काँग्रेस.
लाडक्या बहिणींनी लगेच लक्ष द्या! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय
लाडक्या बहिणींनी लगेच लक्ष द्या! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय.